उपेक्षी कदा रामरूपी असेना । जिवा मानवा निश्चयो तो वसेना
॥
शिरी भार वाहेन बोले पुराणी । नुपेक्षी
कदा राम दासाभिमानी ॥ ३४ ॥
लहानपणी
भागवत गीता ९.२२ मधील “अनन्याश्चिन्तयन्तो
मां ये जना: पर्युपासते | तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्” श्लोक
माझ्या वडिलांच्या तोंडी खूप वेळा ऐकला होता. कारण माझे वडील जिथे काम करत होते त्या
कंपनी चे "योगक्षेमै वहाय्यहम हे ब्रीद वाक्य ..पण आज इतक्या वर्षांनी त्या वाक्याची
आठवण झाली ती या श्लोकमुळे. पहिल्यांदा त्या भगवत गीतेच्या श्लोकाचा अर्थ बघू. भगवंताची
जे भक्त मनापासून उपासना करतात त्यांच्या हिताचे रक्षण करतो , त्यांच्या गरजा पूर्ण
करतो . LIC ची punch line जिंदगी बात भी और जिंदगी के साथ भी हे वाक्य , हा चौस्तीस
क्रमांकचा श्लोक आणि भगवत गीता ९-२२ श्लोक एकाच सांगत आहेत.
रामाच्या
शब्द कोशात उपेक्षा असा शब्दच नाही आहे . मी माझ्या भक्तांचा सर्व प्रकारचा भार वाहीन
असें आश्वासन रामचंद्रांनी दिलें आहे असे पुराणात सुद्धा उल्लेख आहे तोच उल्लेख इथे
समर्थ तिसऱ्या ओवीत करत आहेत . आता या श्लोकात भगवंत गरजा पूर्ण करतो या साठी एक उदाहरण
बघूया घरात ओल्या नारळाच्या करंज्या , लाडू इत्यादी पदार्थ घरात केलेले असतात. तो खाऊ
लहान मुलं आई जवळ मागतात. आई मुलाला एकदम खूप करंज्या /लाडू खाऊ नको, एका वेळेस दोनच मिळतील असे सांगते आणि
मुलगा अजून दे असा हट्ट करतो. परंतु जास्त खाल्ले तर तब्येत बिघडेल आणि डब्यातला सगळं
खाऊ एकदम संपून जाईल आणि नंतर परत भूक लागली तर खायला काहीच उरणार नाही म्हणून आई एकदम
जास्त खाऊ देत नाही. अशा वेळेस त्या मुलाला आईचा राग येतो. आई त्याच्या हिताकरिताच
तसे त्याला सांगत असते हे त्याला समजत नाही. मुलाने जास्त हट्ट केला तर आई अभ्यास जास्त
कर मग अजून एक लाडू देईन असं आमिष दाखवते आणि मग मुलगा अभ्यास करून तो लाडू आई करून
पदरात पडून घेतो. या उदाहरणातला मुलगा आणि आपण यात काही फारसा फरक नाही आहे. कसा ते
बघूया -लाडू करंज्या हे विषय सुख , डब्यात भरून ठेवलेले लाडू/करंज्या म्हणजे प्रारब्ध.
आई म्हणजे भगवंत आणि अभ्यास म्हणजे अनुसंधान किंवा कमावलेले पुण्य . किती खाऊ मिळणार
आहे ते आधीच ठरलेलं आहे कारण डब्यात असेल तेवढेच मिळेल. भगवंत एकदम सगळे विषय सुख देत
नाही कारण आयुष्यात मग असा काळ येईल की त्याला
द्यायला काही उरणारच नाही. आपण कमावलेलं मागच्या
जन्मीचे पुण्य म्हणजे डब्यातला खाऊ , जास्त पुण्य असेल तर भगवंत जास्त सुख देईल पण
ते सुद्धा एकदम नाही कारण भगवंताला भक्ताची काळजी असतेच आणि त्याच्या कल्याणाची सगळी
जबाबदारी आयुष्यभर आणि नंतर सुद्धा तोच घेतो. नुसतेच विषय सुख भगवंत देणार नाही ,थोडं दुःख सुद्धा
वाट्याला येणार जसे आई नावडती भाजी खायला घालते तसे . मुलं जशी अभ्यासाला टाळा टाळ
करतात तसेच आपण भगवंताला विसरतो , तो आपल्या हिताचे करेल का अशी शंका मनात येते , अनुसंधान
सोडून देऊन विषय सुखाच्या मागे लागतो . पण आई जसे मुलाच्या मागे सदैव उभी असते तसाच
भगवंत आपल्या मागे उभा असतो, आपली काळजी सुखाच्या आणि दुःखाच्या प्रसंगात घेतो असतो
पण आपणंच भगवंता बद्दल संदेह बाळगतो आणि आपला दृढ निश्चय होत नाही.
रामावर
खरोखरीच श्रद्धा असती तर आपल्याला प्रपंचाची काळजी वाटली नसती. आपलें कसें होणार असें
भय पडलें नसतें, पण इतकं सगळे मनाचे श्लोक वाचून आणि श्रवण करून आपण आपत्तीत दीन आणि
कासाविसी होतो. भगवंता वरचा विश्वास असतो पण
तो वरवरचा असतो आणि दुःखात संशय येतोच. अरे, मी तुझा भार घेतला आहे, भक्ताचे उत्तरदायित्व
माझ्यावर आहे, असें भगवंतांचे सांगणे आहे, त्याला
व्यासांसारख्या थोर महात्म्याची साक्ष आहे. पण आपले पालथ्या घड्यावर पाणी पडल्या
सारखे मन डळमळीत होतेच. म्हणून तब्बल दहा श्लोक
(२८-३७) समर्थांनी "नुपेक्षी कदा राम दासाभिमानी " असे लिहिले आहे आणि आपला भरवसा
वाढवायचा प्रयत्न केला आहे . आधी विश्वास, मग श्रद्धा , आणि मग निष्ठा असे टप्प्या
टप्प्याने पुढे जायचे असेल तर भगवंतचे नामस्मरण करेन असा साधा निश्चय करायला आपण कमी
पडतो आहोत हे नक्की. माणसाचा माणसावर विश्वास नसेल हे समजू शकते पण रामाने पुराणात
लिहिलेल्या वाचनावर तरी विश्वास ठेव असे समर्थ “जिवा मानवा निश्चयो तो वसेना, शिरी भार वाहेन बोले पुराणी" असे सांगत
आहेत.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
