मना पापसंकल्प सोडूनि द्यावा । मना सत्य संकल्प जीवी धरावा ॥ मना कल्पना ते नको वीषयांची । विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥ संकल्प म्हणजे पुढे काय करायचे आहे त्याचा मनात आलेला विचार . अर्थातच , समर्थ सांगताहेत की आपण पुढील क्रियांबद्दल जे ठरवशील ते केवळ शुद्ध , सत्याला अनुसरून आणि चांगलेच असावे . संकल्प हा निश्चयात्मक असतो आणि विचार किंवा कल्पना अनंत असतात . अमुक मिळवावं , अमुक व्हावं , अमुक घडावं , अमुक साधावं , अमुक करावं , अमुक टाळावं , अमुक स्वीकारावं , अमुक नाकारावं , अमुक टिकवावं .. असे अनंत विचार आणि कल्पना मनात क्षणोक्षणी येत असतात . त्याच एका कल्पनेला दृढ धरून ठेवले किंवा त्याचा ध्यास लागला की त्याचा संकल्प होतो . आपण जो जीवा पेक्षा जास्त सांभाळतो तो खरा संकल्प . पाप संकल्प सोडून द्यावीत आणि त्या साठी विषयात रमणारे मन भगवंता कडे वाळवावे . भगवांताच्या स्मरणाच्या एकमात्र संकल्पात मन रमून गेले तरच त्याने आत्मकल्याण साधेल भगवांत कडे मन वळवणे ...