परी शेवटी काळमूखी निमाला ॥
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले ।
कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥
मनुष्य
अंतकाळी ज्या भावभावनांचं, संस्कारांचं, विचारांचं स्मरण करीत शरीराचा त्याग करतो त्याच
शिदोरीचं गाठोडं घेऊन त्याला पुढील जन्म प्राप्त होतो. जड देह पडतो. मन-बुद्धी-अहंकार
ही त्या देहातील ‘अहम’ची सूक्ष्म द्रव्यं आहेत. ती वाफेप्रमाणे
बाहेर पडतात. त्यात जे संस्कार साठवलेले असतात ते घेऊनच अहं-बीज पुन्हा नवा देह घेऊन
अंकुरतं. आपल्या आजूबाजूची सतत बदलत असणारी सृष्टी अव्यक्तातून व्यक्तात व व्यक्तातून
अव्यक्तात अशी रहाटगाडग्यासारखी चक्राकार फिरत असते. यातूनच जन्म-मृत्यू-पुनर्जन्म
ही योजना दिसते. म्हणजेच मागच्या जन्माच्या वासना राहतात त्यांच्या पूर्ती साठी आपल्याला
मनुष्य जन्म मिळाला आहे असे समर्थ पहिल्या ओवीत लिहितात. देहत्याग कधी होणार हे ठाऊक
नसणं हेच जीवनाचं रहस्य. देहत्यागाच्या वेळी चांगली भावना, चांगला संस्कार बरोबर असावा
हे म्हणणं सोपं, पण अत्यंत गूढ आहे. तत्त्वचिंतक याचं उत्तर असं देतात की, कायमच आपलं
मन शुद्ध, सुसंस्कारित ठेवावं म्हणजे झालं. मग केव्हाही मृत्यू आला तरी चालेल. हे मनात
ठरवून जिवंतपणी अशी सवय लावून घेतली पाहिजे की, अंतकाळी आपसूकच तो संस्कार जागृत होईल.
यास्तव सदैव मरणाचं स्मरण राखून जीवन जगायला हवं. त्या जगन्नियंत्याचं, परमेश्वराचं
अखंड भान ठेवून ध्यान करीत मार्गक्रमणा घडली की, शेवटचा दिस गोड होईल.
एक
चमत्कारिक मनुष्य होता. तो रोज एका गळक्या पिशवीत एक किलोभर अन्न ठेवत असे. दुसऱ्या
दिवशी पुन्हा एक किलोभर. खालून पिशवीला भोक होते, हे त्याला माहीत होते. अन्न गळत होते.
पण पन्नास वर्षे हा आपला अन्न ‘साठवीत होता. आणि पन्नास वर्षात अठरा हजार दोनशे पन्नास
किलो धान्य त्याने गमावले होते. हा खुळा माणूस म्हणजे तुम्ही आणि मी. पोटाच्या गळक्या
पिशवीत जन्मापासून रोज किलोभर धान्य टाकतो. ते गळून जाते आहे. पण पोट भरल्याचा आपला
अभिमान काही गळून जात नाही. आपली सारी ही शक्ती जन्मापासून आपण व्यर्थ आणि वाया घालवीत
आहोत, ही रामदांच्या चौदाव्या श्लोकाची सूचना आहे. इतकं करून सुद्धा आपण तृप्त होत
नाही , कायम असमाधानीच राहतो. पोट भरायला आणि इतर सुख सोई मिळवण्यासाठी इतके कर्म करतो
पण त्यातून निष्पन्न शून्य. आपल्याला मनुष्य जन्म मिळाला तो आपल्या आधीच्या जन्माच्या
पुण्य कर्मावर . धडधाकट शरीर , चांगले आई वडील , मुलांचे पालन पोषण करता येईल इतका
पैसा मिळाला असेल तर हा जन्म सार्थकी का लावत नाही असा समर्थ प्रश्न विचारात आहेत.
शेवटी प्रत्येकाला मृत्यु अटळ आहे हे माहित असूनही आपण एकदम बिनधास्त पणे आयुष्य विषय
सुखात घालवतो याचे समर्थांना दुःख आहे . किती तरी थोर राजे, अतिश्रीमंत व्यापारी, पंडित,
विद्वान जन्मले आणि त्यांना सुद्धा मृत्यूवर
विजय मिळवता आला नाही गेले. एका नामांकित भारतीय डॉक्टरने कॅन्सर रुग्णांशी मृत्यूशी
झुंज देतांना संवाद साधला असता त्यांना किती तरी रुग्णांनी त्यांना आयुष्यात केलेल्या
कर्मांचा पश्चाताप झाल्याचे सांगितले. तशीच भावना I-PHONE कंपनी चा मालक स्टिव्ह जॉब्स
याने मृत्यु समयी लिहिले आहे
At
this moment, lying on the sick bed and recalling my whole life, I realize that
all the recognition and wealth that I took so much pride in, have paled and
become meaningless in the face of impending death. In the darkness, I look at
the green lights from the life supporting machines and hear the humming mechanical
sounds, I can feel the breath of god of death drawing closer. Now I know, when
we have accumulated sufficient wealth to last our lifetime, we should pursue
other matters that are unrelated to wealth. Should be some-thing that is more
important: Perhaps relationships, perhaps art, perhaps a dream from younger
days. Non-stop pursuing of wealth will only turn a person into a twisted being,
just like me. God gave us the senses to let us feel the love in everyone’s
heart, not the illusions brought about by wealth. The wealth I have won in my
life I cannot bring with me. What I can bring is only the memories precipitated
by love. यावरून एकच निष्कर्ष काढता येईल की इतका
थोर , कर्तबदार आणि गर्भ श्रीमंत मनुष्य सुद्धा
मी माझे आयुष्य वाया घालवले असे म्हणतो. आपले आयुष्य प्रापंचिक कर्मात वाया घालवू नका
हेच समर्थांनी ४०० वर्षा पूर्वी नव्हते का सांगितले ?
।। जय जय रघुवीर समर्थ !!
