मुखी राम त्या काम बाधू शकेना । गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ॥ हरीभक्त तो शक्त कामास भारी । जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८७ ॥ श्लोकाचा अर्थ समजून घेण्याआधी “काम” आणि “ब्रह्मचारी” या दोन शब्दांचा अर्थ समजून घेऊ- काम : कोणतीही गोष्ट हवी असे वाटणे म्हणजे काम. ती गोष्ट म्हणजे घर , सत्ता ,नौकरी , संपत्ती किंवा स्री पासून मिळणारे शरीरसुख अशा सगळ्या गोष्टी कामची वासना या मध्ये येतात. स्त्री पासून मिळणारे सुख नेहेमीच त्याज्य नसते. शरीरसुख आणि कामवासने मध्ये सुद्धा धर्माच्या चौकटीत राहून काम उपभोगणे आणि अधर्माने काम वासना तृप्त करणे अशीं दोन रूपें आहेत. गीतेच्या सातव्या अध्यायामध्ये धर्माच्या मर्यादेत राहणाऱ्या कामाला भगवंताचे स्वरूप मानलें आहे, तर अधर्म्य कामाला 'महाशन', 'महापाप्मा' अशी विशेषणें देऊन गीतेने तिसऱ्या अध्यायांत त्याला मनुष्यजातीचा वैरी म्हणून संबोधिले आहे. सोळाव्या अध्यायात त्याला नरकाचे दार म्हटलें आहे. त्यामुळे धर्माच्या चौकटीत राहून शरीर सुख उपभोगणे त्याज्य नाही. ब्रह्मचारी : म्हणजे जो सदैव ब्रह्माचे चिंतन करत असतो असं मनुष्य आणि त्यामु...