मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणे नीच सोशीत जावे ॥ स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥ आपल्या समाजात एक चुकीचा समज आहे की अध्यात्मिक मार्गावर वाटचाल करणारे लोक मनाने कमकुवत असतात आणि त्यांना संकटांना तोंड द्यायची ताकद नसते. ते रामाचा आधार शोधतात कारण त्यांची मानसिक शक्ती कमी असते आणि ते मनाने खूप घाबरट असतात . या श्लोकात समर्थांना सांगायचे आहे की ज्या क्षणी मनुष्य साधना करायला सुरुवात करतो त्याने लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की लोक निंदा , विरोध आणि टिंगल करणारच आणि त्याला तोंड देण्यासाठी त्याने स्वतः चे मानसिक बळ वाढवणे गरजेचे आहे. एकांतांत साधना सुरु केल्यानंतर धैर्याने अशा अपमान आणि टिंगल करण्याऱ्या लोकांना तोंड द्यायला शिकावे . शिवाय साधकाला जिद्द हवी आणि हतबलता येऊ देऊ नये. आपण काकस्पर्श हा मराठी चित्रपट बघीतला होता का? त्या मध्ये स्वातंत्र पूर्व काळात बाल विधवांचे कसे हाल व्हायचे याचे चित्रीकरण आहे . त्याच काळातील अजून एका बालविधवेचे आयुष्य कसे बदलले याची गो...