जेणें मक्षिका भक्षिली जाणिवेची। तया भोजनाची रुची प्राप्त कैंची। अहंभाव ज्या मानसीचा विरेना। तया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना।। १५९।। माशी पोटांत गेली कीं मळमळतें. पोटांत ढवळतें, उलट्या होतात. कितीहि पंच पक्वान्नाचे रुचकर अन्न पानांत असले तरी माशी पोटात गेलेल्या स्थितींत त्याचे पचन होत नाही ढवळते, त्याची रुचीहि लागत नाही, स्वाद कळत नाहीं, खावे, जेवावे, अशी वासना राहत नाहीं. खाल्लेले सुग्रास अन्न वमनक्रियेने बाहेर पडते; एकदम चपखल आणि कोणालाही समजेल अशी उपमा इथे श्रीरामदासांनी येथे दिली आहे. म्हंणूनच एखादे काम व्हावयाचे नसले, म्हणजे ‘माशी शिंकली’ असे आपण म्हणतो. आपण कोणीतरी मोठे आहोत याची जाणीव, अहंकार, मीपणा हें सगळे विकार माशीसारखे आहेत. साधक कितीही ज्ञानी झाला आणि अनेक ग्रंथ आणि सगळ्या वेदांचे वाचन मनन केले त्याचा फायदा होणार नाही पर्यंत त्याचा मनातील अहंकार आणि मीपणा कमी होणार नाही. ज्ञान घेता घेता माणसाला अहंकार झाला, म्हणजे तेथे अहंकाराची माशी शिंकल्यासारखीच झाली आणि तो अहंकार असल्यामुळे, पोटातच असल्यामुळे, तिथली माशी फार काळ जिवंत राहू शकणार नाही. जोपर्यंत आपला अहंक...