जनी सांगतां ऐकतां जन्म गेला । परी वादवेवाद तैसाचि ठेला ॥ उठे संशयो वाद हा दंभधारी । तुटे वाद संवाद तो हितकारी ॥ ११२ ॥ वाल्मीकि- व्यास यांच्यापासून ते ज्ञानेश्वर-तुकाराम-रामदास यांच्यापर्यंत किंवा त्यानंतर गोंदवलेकर महाराज, श्रीधर स्वामी किंवा पूज्य बाबा बेलसरे यांच्या पर्यंत यांच्यापर्यंत अनेक थोरामोठ्यांनी चांगलें काय, हिताचे काय तें सांगितलें. अनेक ग्रंथ लिहिले, प्रवचने आणि किर्तने केली. मधुर-रसाळ अभंग लिहिले . काही कठोर पाने सांगितले कधी समजुतदार पणे सांगितलें. गोंडवेलंकर गोंदवलेकर महाराज यांनी शेवटचे खंत बोलून दाखवली "सगळे हिंग जिऱ्याचे गिऱ्हाईक आहेत, कस्तुरी साठी कोणीच येत नाही ". त्यांनी निरसनाकरितां केलेले वादविवाद जिथल्या तिथे, जसेच्या तसेच राहिले आणि ते निघून गेले .हे सगळे थोर महात्मे स्वतःपुरते तरी मुक्त होते, कोणी बद्ध जीव नव्हते. ते लोककल्याणासाठी अवतार घेऊन आले होते. आपलें कार्य संपताच निघून गेले. भगवंताशी एकरूप झाले. इतर बापडे ऐकणारे तर काय पण त्यांचे वाचून सांगणारेहि ठिकच्याठिकाणीं राहिले. अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, पुराणिक, व्याख्याते ...