नको रे मना वाद हा खेदकारी। नको रे मना भेद नानाविकारी॥ नको रे मना शीकवूं पूढिलांसी। अहंभाव जो राहिला तूजपासी॥१६०॥ अहंकारामुळे आपल्या आयुष्यात किती नुकसान होऊ शकते याचे आधी पण अनेक श्लोक येऊन गेले आहेत. पारमार्थिक प्रगतीमध्ये अहंकार हा मुख्य शत्रू आहेच. त्याला उपाय प्रत्येक गोष्टीच्या मागे "राम कर्ता " भावना ठेवणे किंवा शरणागती पत्करणे. तसे केल्या शिवाय आत्मज्ञान होणार नाही. पण प्रपंचात सुद्धा अहंकाराने आपले नुकसान होते. कसे ते या श्लोकात त्यांनी अतिशय साध्या शब्दात सांगितले आहे. अहंकारामुळे वादविवाद वाढत जातात आणि त्यातून खेद वाढत जातो. आपल्या मनात इतरांच्या विषयी भेद निर्माण होतात आणि त्यामुळे द्वेष मत्सर वाढून त्यातून मनस्ताप वाढत जातो. शेवटी शारीरिक विकार सुरु होतात. तिसरी गोष्ट म्हणजे आपण दुसऱ्याला शिकवायला जातो आणि त्याने ऐकले नाही परत आपल्याला दुःख होते. हे तीन दुष्परिणाम एकट्या अहंकारामुळे होतात. अहंकार, EGO, ह्याचा मुळ अर्थ, मी किंवा माझे, मीपणा असा होतो. अर्थातच तुम्ही कोण आहात ? ह्याचं तुम्ही स्वतःला दिलेलं उत्तर म्हणजे अहंकार. आपण स्वत:बद्दलची केलेली संज्ञा(...