प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा॥ सदाचार हा थोर सांडूं नये तो। जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥ वरवर दिसावयास अगदी व्यावहारिक आणि तांत्रिक उपाय समर्थ सांगत आहेत . तसें म्हटले तर कोणालाहि साधाव्या , आचरणांत आणण्यास सोप्या जाव्या आणि निष्ठेने करीत राहिल्या तर अधिकाधिक भगवंताच्या निकट जाण्यासाठी हे उपाय आहेत. सूर्योदयापूर्वीच्या २ - ३ तास म्हणजे प्रभातकाळ , सामान्यतः ४॥ पासून ६ - ६॥ पर्यंतचा काळ प्रभातकाळ म्हणता येईल , . त्या वेळेस उठून सकाळी काही काळ रामाचे स्मरण केले तर दिवसभर आपल्याला स्मरण राहायला मदत होते . हें नामस्मरण वैखरी ने ( उच्चरून किंवा ओठ आणि जीभ हलवत ) करण्यासाठी समर्थ आपल्याला सांगत आहेत . वैखरीच्या वाणीच्या आधीं ज्या मध्यमा ( गळ्यातून ) पश्यन्ति ( ह्दयातून ) आणि परा ( बेंबी पासून ) अशा वाणी शास्त्रकारांनी सांगितलेल्या आहेत त्याद्वारा करावें , परेच्याद्वारा नामस्मरण घडणे ही गोष्ट सर्वसामान्यांच्या दृष्टीने फार अवघड ...