बहू हिंपुटी होईजे मायपोटी ।
नको रे मना यातना तेचि मोठी ॥
निरोधे पचे कोंडिले गर्भवासी ।
अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २० ॥
श्लोकात
खूप अवघड शब्द आहेत त्याचे अर्थ आधी सांगतो म्हणजे श्लोक समजायला सोपा जाईल .
हिंपुटी म्हणजे painfull/ वेदना निरोधे म्हणजे
BARRIER /अटकाव
पचे म्हणजे
suffocate / जीव गुदमरणे . अधोमूख म्हणजे
downward-facing /खाली डोके वर पाय
एखादी
अत्यंत अवघड हृदयाची शस्त्रक्रिया झाल्यावर मरता मरता वाचलो असू तर आपण लोकांना फार
अभिमानाने शस्त्रक्रियाचे टाके दाखवतो आणि
रंगवून सांगतो की किती यातना भोगल्या, दुःख सहन केले आणि शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरचे
आयुष्यभर आभार मानतो आणि त्यांचे गुणगान गातो, त्यांनी सांगितलेली सगळी पथ्यं तंतो
तंत पाळतो नाही तर परत आजार बळावेल. मनुष्य जन्माच्या वेळेस सुद्धा गर्भाला आणि मातेला
अत्यंत वेदना झालेल्या असतात . त्यामुळे आपण देवाचे आभार मानायला पाहिजेत, संतांनी
सांगितलेले भगवंताचे अनुसंधान ठेवले पाहिजे नाहीतर परत त्या जन्माच्या आणि मृत्युच्या
वेळच्या वेदना वेदना सहन कराव्या लागतील असा या श्लोकाचा गर्भितार्थ आहे.
बाळंतपणात
मातेला किती कष्ट सोसावे लागतात आणि त्याबरोबरच बाळाला
किती यातना होतात हे या श्लोकातून सांगत आहेत . आतल्या बाळाला फार यातना होतात कारण
तो तिथे शिजत असतो, पचत असतो. पण वाढ होण्यासाठी या उष्णतेची आवश्यकताच असते. थंडींत
वाढ होत नाहीं. वाढीसाठी उष्णताच उपयोगी असते. उदाहरण धान्याला मोड यायला सुद्धा थोडी
उष्णता लागतेच , दुधाचे दही होतांनाहि थोडी उष्णता लागतेच, इथे तर पूर्ण शरीर तयार
होत असते त्यामुळे जीव अक्षरशः उकडून निघत असतो . या जगात जन्मल्यानंतरच यातना भोगाव्या
लागतात हे खरे नाही. आईच्या पोटात असल्यापासूनच यातनांचा भोग सुरु होत असतो. गर्भाशयाच्या
अगदी छोट्याश्या जागेत भरलेल्या द्रवात बालकाला वावरावे लागते. त्याला स्वत:च्या हालचालींवर
काहीही नियंत्रण ठेवता येत नाही. आकाराने वाढत असताना ती जागा अपुरी पडते तसा चाहु
बाजूनी दाब वाढतो. गर्भाचे पोषण नि आरोग्य पूर्णपणे आईच्या आहारविहारावर अवलंबून असल्यानें
तिने अज्ञानाने वा मोहानें केलेले अनेक वाईट आचार तिच्यापेक्षा, कोवळ्या गर्भालाच अधिक
भोगावे लागतात. हें परस्वाधीनपण फारच केविलवाणे आहे. म्हणूनच समर्थ बहू हिंपुटी होईजे
मायपोटीं असें म्हणतात. नऊ महिने खाली डोके वीर पाय या स्थितीत राहावे लागत कारण बाहेर
यायला ते सौयीचे असते . पण आतला जीव मुकाटपणे सहन करत असतो कारण त्याला काहीही पर्याय
नसतो . बाहेर येतांना मातेला आणि बाळाला किती असह्य वेदना होतात . बाळंत पणाच्या कळा
म्हणजे मातेचा पुनर्जन्मच झालेला असतो. चारशे वर्षा पूर्वी गर्भातच मृत्यु , बाळंतपणात
आई किंवा मुलाचा मृत्यू किंवा नंतर बालमृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त होते . म्हणजे
इतक्या सगळ्या संकटांशी सामना करून, झगडून आपल्याला जन्म मिळाला आहे तो वाया घालवू
नये, या जन्मी भगवंताचे अनुसंधान ठेऊन जन्ममृत्यु च्या राहाटगाडग्यात अडकू नये असे
समर्थांना इथे सांगायचे आहे. त्यासाठी त्यांनी मातेच्या गर्भातील वेदना आणि कष्ट सांगून
आपल्याला परत जन्म यातना पुन्हा भोगण्याचा प्रसंगच येणार नाहीं असे आयुष्य घालवा असे
ते म्हणत आहेत
जन्म
यातना अपरिहार्य असतातच पण एकादी गोष्ट अपरिहार्य असेल पण त्यामुळें ती चांगली ठरत
नाहीं आणि अपरिहार्य म्हणून चांगली वाटतांहि कामा नये. लहान मुलं मलमूत्रांत लोळते
व त्याहि स्थितींत तें हात पाय हालवीत हसत खिदळत असतें. थोडे मोठे झालें तर तें विष्ठाहि
चिवडतें. पण शहाणी आई, दक्ष आई, त्याला तसे करूं देत नाहीं. मुलाला लगेच स्वच्छ करते.
त्यावेळी ते मुलं रडतेच कारण त्याला स्वच्छतेचे महत्व कळत नसते आणि आई त्याला धुवून
पुसून स्वच्छ करीत असते. तसेच समर्थ इथे आपल्याला आपलं नशीब किती बलवत्तर आहे आणि देवाची
कृपा म्हणून हातपाय धड असलेले शरीर मिळाले आहे, ते शरीर विषय सुखात लोळून वयाला घालवू
नको असे कळकळीने पटवून देण्या साठी हा श्लोक आहे
या
श्लोकातुन समर्थांना विज्ञानाबद्दलची किती सखोल माहिती होती याची झलक समजते.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

