जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला । परी शेवटी काळमूखी निमाला ॥ महाथोर ते मृत्युपंथेचि गेले । कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥ मनुष्य अंतकाळी ज्या भावभावनांचं, संस्कारांचं, विचारांचं स्मरण करीत शरीराचा त्याग करतो त्याच शिदोरीचं गाठोडं घेऊन त्याला पुढील जन्म प्राप्त होतो. जड देह पडतो. मन-बुद्धी-अहंकार ही त्या देहातील ‘अहम ’ ची सूक्ष्म द्रव्यं आहेत. ती वाफेप्रमाणे बाहेर पडतात. त्यात जे संस्कार साठवलेले असतात ते घेऊनच अहं-बीज पुन्हा नवा देह घेऊन अंकुरतं. आपल्या आजूबाजूची सतत बदलत असणारी सृष्टी अव्यक्तातून व्यक्तात व व्यक्तातून अव्यक्तात अशी रहाटगाडग्यासारखी चक्राकार फिरत असते. यातूनच जन्म-मृत्यू-पुनर्जन्म ही योजना दिसते. म्हणजेच मागच्या जन्माच्या वासना राहतात त्यांच्या पूर्ती साठी आपल्याला मन...