सदा सर्वदा देव सन्नीध आहे । कृपाळूपणें अल्प धारिष्ट पाहे ॥ सुखानंद आनंद कैवल्यदानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥ आपल्याला नेहेमी संकट समयी देवाला दोष द्यायची सवय असते . पण त्याआधी प्रत्येकाने हा श्लोक वाचावा म्हणजे संकटे का येतात आणि त्याकडे आपण कसे बघावे याचा दृष्टिकोन बदलेल . भगवंत आपल्या हृदयातही वास करतो असें या श्लोकात आणि सनातन हिंदू धर्मात सांगितले आहे . तेव्हां भक्तावर आलेले संकट ईश्वराला आधीं कळावे लागतें आणि तें नाहींसें करण्याकरितां तो दुरून कुठून तरी धावून येतो असें समजणें हें नक्कीच अज्ञानाचें लक्षण नाही का ? ईश्वर तर जवळच आहे तर मग संकटे येतांतच कां आणि आली तरी ती लगेच नष्ट होत कशी नाहींत , असा प्रश्न आपल्याला संकट समयी पडणे पडणे स्वाभाविक आहे . त्यावर समर्थ म्हणतात , परम...