बहू शास्त्र धुंडाळितां वाड आहे । जया निश्चयो येक तो ही न साहे ॥ मती भांडती शास्त्रबोधें विरोधें । गती खुंटती ज्ञानबोधें प्रबोधें ॥ १५७ ॥ अध्यात्म शास्त्रात अनेक पुस्तके आहेत आणि भागवत प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत . प्रत्येक पुस्तक वाचून त्यातील अर्थ समजून घेणे शक्य नाही आणि त्यामुळे अजून गोंधळ निर्माण होणेच होण्याचा संभव जास्त . आपण किती वाचावे, आणि त्याचा अहंकार मिरवावा का या बद्दल समर्थानी इथे भाष्य केले आहे . ग्रंथ अनंत आहेत आणि रोज एक ग्रंथ वाचून संपवतो म्हटलें तरी माणसाचे आयुष्य पुरणार नाहीं. जेवढें होईल तेवढे वाचले म्हटलें तरी त्यातून पदरांत हे महत्वाचे. परमेश्वर आणि मोक्ष प्राप्तीचे विविध मार्ग आहेत. कर्म, शरीर, जन्ममरण, दुःख, पाप इ. अनिष्ट बंधनातून मुक्त झाल्यामुळे जीवाला प्राप्त होणारी पारमार्थिक कल्याणाची सर्वोत्तम अवस्था म्हणजे मोक्ष. जगातील विविध धर्म व संप्रदाय आपल्या अनुयायांना मोक्ष देण्याचे आश्वासन देत असतात आणि त्यासाठी आपण उपदेशिलेल्या मार्गाचा लोकांनी अवलंब करावा, असा त्यांचा आग्रह असतो. भगवद्गीतेत चार धार्मिक संप्र...