बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा। परी अंतरी पाहिजे तो निवाडा॥ मना सार साचार ते वेगळे रे। समस्तांमधे एक ते आगळे रे॥१५२॥ अमेरिकेची यात्रा म्हणजे विवेकानंदांचे एक विलक्षण साहसच होते.. अमेरिकेत कुठेतरी, केव्हातरी एक सर्वधर्मपरिषद होणार आहे, एवढंच त्यांनी अस्पष्टपणे ऐकलेलं होतं. या परिषदेबद्दलची निश्चित आणि तपशीलवार माहिती मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी, त्यांचे शिष्य, भारतीय मित्र, विद्यार्थी, पंडित, मंत्री किंवा महाराजांनी कुणीही केली नव्हता. तरीही हा तरुण स्वामी त्या परिषदेस जाण्यास निघाला होता. सर्वधर्म परिषद सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात असून प्रतिनिधी म्हणून नाव नोंदणीची तारीख निघून गेल्याचं त्यांना कळालं. मान्यताप्राप्त धार्मिक संस्थेचे ओळखपत्र असल्याशिवाय प्रतिनिधी म्हणून कोणाचंही नाव स्वीकारलं जाणार नसल्याचंही माहीत झालं. आकर्षक देहयष्टीमुळं विवेकानंद कुठंही जात असले, तरी लोकांच्या नजरेतून सुटत नसत. बोस्टनच्या गाडीतच मॅसेच्युसेट्स इथल्या एका श्रीमंत महिलेशी त्यांचा संवाद सुरू होता. महिलेनं विवेकानंदांना आपल्या घरी राहण्यास बोलावलं. इथंच विवेकानंदांची हार्वर्ड विद्यापीठातील ...