। भजावा जनीं पाहता राम एकू । करी बाण एकू मुखी शब्द एकू ॥ क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू । धरा जानकीनायकाचा विवेकू ॥ १३१ ॥ "जय जय राम कृष्ण हरी " हा वारकरी भक्तांचा मंत्र सगळ्यांना माहिती आहेच. पण त्यात जो देवाचा क्रम आहे त्याला खूप महत्व आहे. रामचे चरित्र सर्व सामान्य लोकांना अनुकरणीय आहे म्हणून त्याचे नाव पहिल्यांदा घेतले आहे . रामाचा आचार , कृष्णाचा विचार आणि त्याच बरोबर विठ्ठल नामाचा उच्चार करावा म्हणून हा मंत्र आहे. त्याच मंत्रातील प्रभू राम चंद्राच्या सद्गुणांचे वर्णन समर्थ या १३१ क्रमांक च्या श्लोकात करत आहेत. भक्ताच्या आयुष्यात येणारा सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो किंबहुना असायला हवा तो म्हणजे चरित्र अभ्यासाचा. आणि केवळ भक्तीमार्ग नव्हे तर कुठल्याही विषयाशी निगडीत कुठल्याही व्यक्तीला जेव्हा आपण आदर्श म्हणून स्वीकारतो , तेव्हा त्यांचा चरित्र्य अभ्यास ही त्या साधकाच्या दृष्टीने असणारी फार महत्त्वाची गोष्ट असते ...आपण ज्या व्यक्तीचं अनुकरण करत असतो ...ती व्यक्ती प्रत्येक वेळी सहवासाच्या रूपानेच आपल्याला मिळते असं नाही ...तर तिच...