अनुक्रमणिका

|| भये व्यापिले सर्व ब्रह्मांड ...भयो मानसी सर्वथाही असेना ॥ १३६ ॥ अहो ज्या नरा रामविश्वास ....वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८ ॥ गणाधीश जो ईश सर्वा ....गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥ जगीं पाहतां साच तें काय ...भ्रमे भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ॥ १४४ ॥ जनी सांगतां ऐकतां जन्म ..... तुटे वाद संवाद तो हितकारी ॥ ११२ ॥ जनीं भोजनीं नाम वाचे वदावे .....तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ ८९ ॥ जनीं सर्वसूखी असा कोण ....त्यासारखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥ जिवा कर्मयोगे जनीं जन्म....कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥ जेणें मक्षिका भक्षिली ...तया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना।। १५९।। तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले....गुरूवीण तो सर्वथा ही न दीसे ||१७९ ||
धुरू लेकरूं बापुडे ....नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७ ॥ न ये राम वाणी तया थोर ...बहू आगळें बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥ नको रे मना वाद हा ....अहंभाव जो राहिला तूजपासी॥१६०॥ नव्हे कर्म ना धर्म ना.......प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥ प्रभाते मनीं राम चिंतीत ..जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥ फुकाचे मुखी बोलता काय ...विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ॥ ११४ ॥ बहू शास्त्र धुंडाळितां वाड ...गती खुंटती ज्ञानबोधें प्रबोधें ॥ १५७ ॥ बहू हिंपुटी होईजे ....अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २० ॥ बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा.....समस्तांमधे एक ते आगळे रे || १५२ }} भजावा जनीं पाहता राम एकू .....धरा जानकीनायकाचा विवेकू ॥ १३१ ॥ भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे......परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८७॥ मना पापसंकल्प सोडूनि ....विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥ मना पाविजे सर्वही सूख .....मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४० || मना मानसीं दुःख ... विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥ मना वासना दुष्ट कामा .. मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥ मना वासना वासुदेवीं.....मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे ॥ १२८ ॥ मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे......मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥ मना सज्जना भक्तिपंथेची ....जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥. मुखी राम त्या काम बाधू शकेना.......जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८७ ॥ सदा सर्वदा देव सन्नीध आहे....नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥ shlok 001 to 010
अधिक दर्शवा




 उभा कल्पवृक्षातळू दुःख वाहे । तया अंतरी सर्वदा तेचि आहे ॥

जनीं सज्जनीं वाद हा वाढवावा । पुढे मागता शोक जीवी धरावा ॥ ६१ ॥


आपण सगळ्यांनी अर्ध्या भरलेल्या पेल्याचे उदाहरण तर किमान दोनशे वेळेला तरी ऐकले असेल.  पेला अर्धा भरलेला आहे असे म्हणणारे आशावादी आणि अर्थ पेला रिकामा आहे असे म्हणणारे निराशावादी. या पुढे जाऊन “वास्तववादी” मोदी म्हणतात अर्थ पेला भरलेला आहे आणि बाकीच्या अर्थ भागात हवा भरली आहे. समर्थ आपल्याला वर्तमानवादी असावे असे शिकवतात. 



जें जें मनांत येईल ते तें जो पुरवितो त्या वृक्षाला कल्पवृक्ष असे म्हणतात. त्याच्यातळी उभा राहून जर कुणी दुःखाची कल्पना करील तर त्याला सतत दुःखच भोगावे लागेल. ‘अमुक मिळावं,’ ही जिवाच्या मनात उत्पन्न होणारी इच्छा भ्रामक आणि निराशावादी सुद्धा असू शकते. मग ती इच्छा योग्य आहे की अयोग्य, आपल्या हिताची आहे की अहिताची, याचा कोणताही विचार ती इच्छा पूर्ण करताना कल्पतरू करीत नसतो. कल्पवृक्ष हे काल्पनिक असले तरी मानस शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तरी सुद्धा आपल्या माहिती आहे आपण ज्या वातावरणात वाढतो, त्या वातावरणाचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो. आपल्या आसपास सतत नकारात्मक विचार करणारी माणसे असतील, तर आपली मानसिकताही तशीच होते. त्यातून सतत निराशावादी विचार करण्याची, न्यून शोधत राहण्याची वृत्ती तयार होते. ती आपल्या यशाच्या वाटचालीतील मोठा अडसर ठरू शकते. मिळाले आहे ते सुख विसरून जायचे आणि प्राप्त झालेली दुखेंः घोळींत राहाणे हाच निराशावादी मनुष्याचा स्वभाव असतो. ज्याच्यामुळें सुख वाटाचे अशी परिस्थिति भोवती अगदींच नसते असें नाहीं पण सदैव अर्था रिकामा पेलाच बघण्याची सवय झालेली असल्या मुळे अशा लोकांना नेहेमीच रडगाणे गायची सवय असते आणि त्यामुळे त्यांना अपयश येते. "एक धागा सुखाचा आणि शंभर धागे दुःखाचे" आणि तुकोबाचे "सुख जवापाडे दुःख पर्वता एवढे" हे दोन्ही अभंग निराशावादी लोकांचे वर्णनच करतात.



आपल्या दैनंदिन जीवनात आशेचे आणि निराशेचे क्षण येत असतात आणि जात असतात. निराशेच्या क्षणी कोणाचीही मानसिक अवस्था मोठी विचित्र असते. आता चांगले काही घडणारच नाही, अशा विचारांच्या लाटा मनाच्या अंतरंगात उमटत असतात. पराकोटीची संवेदनशील अथवा भावनिक झालेली माणसे या निराशेपोटी स्वतःला संपविण्याचा अघोरी मार्ग अवलंबतात. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांकडे पाहण्याची आपली मानसिकता आशावादी आहे, की निराशावादी आहे, हे प्रत्येकाने तपासून पाहिले पाहिजे. श्लोकात म्हंटल्या प्रमाणे कल्पवृक्षा च्या खाली बसून दुःख करणे म्हणजे निराशावादी असणे नाही का? आपल्या अंतःकरणात भगवंत आहे आणि त्याच्या स्मरणात राहून आपण कर्म केले की ते सफल होणारच आहे असं विचार करायचा सोडून निराशावादी लोक दुःख उगाळत बसतात आणि आधी घडलेल्या काही वाईट गोष्टी आठवत बसतात आणि आपल्या स्वतः बरोबरच आजूबाजूच्या लोकांची मनस्थिती सुद्धा दुखी करून टाकतात आपण जसा विचार करतो तसे आपल्याकडून बोललो जातें, आपण जे बोलतो त्याची स्पंदने आपल्या अंतर्मनात उमटत असतात. त्यानुसार आपली बुद्धी आणि कर्मेंद्रिये काम करीत असतात. त्यामुळे ‘बोला चांगभलं’ची वृत्ती जोपासली पाहिजे. दुःख उगाळून आपल्या कडून वर्तमानात सुद्धाचुकीचे निर्णय घेतले जातात आणि हातात असलेले काम सुद्धा बिघडून जाते. एखादा मुलगा एखाद्या विषयात नापास होतो, तेव्हा त्याच्या नापास होण्याची चर्चा होते. खरेतर सहा विषयांपैकी पाच विषयांत तो पास झालेला असतो आणि एकाच विषयात तो नापास झालेला असतो. पाच विषयांत तो पास झालेला आहे, या सकारात्मक गोष्टीकडे पाहून जेव्हा त्याच्या एका विषयात नापास होण्याविषयी विचार होईल, तेव्हाच त्याच्या त्या विषयातील अपयशांची कारणे शोधता येतील. चार वेळा प्रयत्न करून दुसऱ्याला गणित सुटले, तर आठ वेळा प्रयत्न करणारा जास्त महत्त्वाचा; कारण तोच खरा जिद्दी असतो, न थकता प्रयत्न करणारा असतो. अशा भूमिकेतून पाहण्याची दृष्टी आत्मसात करावी असे समर्थाना अभिप्रेत आहे. (उभा कल्पवृक्षातळू दुःख 

वाहे। तया अंतरी सर्वदा तेचि आहे)



ते पुढे लिहितात की असे निराशावादी लोक जवळच्या सज्जन लोकांनाही तसेच निराशावादी बनवतात. काही लोक आपले रडगाणे घेऊन संतांच्या कडे सुद्धा जातात आणि त्यांना आपली चिंता सांगतात. वास्तविक संत आपल्याला भगवंताचे प्रेम कसे वाढवावे आणि त्याची प्राप्ती कशी करून घ्यायची याचे मार्गदर्शन करण्यासाठी असतात. अशा महात्म्याकडे जाऊन ही निराशावादी लोक आपले नुकसान तर करून घेतात. त्यामुळे त्या संत/सज्जनांना सुद्धा सुद्धा दुःख होते. तिसऱ्या ओवीत समर्थ म्हणतात सज्जन लोकांच्या कडे आपण गेल्याने ते आपल्याला सारा विचार करायला शिकवतात. पण आपण त्यांच्याकडे आपले दुःख घेऊन गेलो तर त्यांना दुःख होतेच आणि आपल्याला आपली आत्मज्ञान करून घेण्याची संधी हुकते. (आत्मउन्नती कशी करून घ्यायची याचे मार्गदर्शन मिळत नाही आणि पदरात शोक येणार (जनीं सज्जनीं वाद हा वाढवावा । पुढे मागता शोक जीवी धरावा ॥)


नेहमी सकारात्मक विचार करावा आणि Hope for the best, prepare for the worst" याची तयारी असावी असा प्रयत्नवादी मानसिकता बनवणारा श्लोक आपण वाचून आचरणात आणला तर यश मिळेलच आणि अपयश आले तरी आपण खचून जाणार नाही. मागचे आलेले दुःख पटकन विसरून जावे, पुढच्या कामाची कसून तयारी करावी आणि काळजी करत बसू काये. LIVE FROM MOMENT TO MOMENT किंवा, LIVE IN PRESENT MOMENT असा या श्लोकचा गर्भितार्थ आहे. 


 ।। जय जय रघुवीर समर्थ ।।


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मना मानसीं दुःख आणू नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥ विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी । विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी