फुकाचे मुखी बोलता काय वेचे । दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे ॥ क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे । विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ॥ ११४ ॥ “लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण” ही म्हण मराठीत प्रचलित आहे . स्वतः थोडी पुस्तके वाचली , इंटरनेट वर माहिती मिळवली आणि वक्तृव आत्मसात केले की त्या जोरावर लोकांना आकर्षक वाटेल असें बोलणेंहि सोपे जाते त्या साठी फार काही कष्ट घ्यायची जरूर नसते . “ गूगल” मुळे सहज संदर्भकोश , विषयवारीनें संग्रहित सुभाषिते , संतांच्या वचनांचे संग्रह , कोणालाहि सहज उपलब्ध होऊ शकतात . त्यामुळे त्यांच्या सहाय्याने , त्यामानानें अगदीं थोडे श्रम करून लिहिणे आणि बोलणे सोपे जाते . पण हें सर्व बोलणे किंवा लिहिणे फुकट जाऊ शकते . नुसते बोलायला किंवा लिहियला काहीही कष्ट आणि ज्ञान लागत नाही असे समर्थ इथे म्हणतात ? सामान्यजन आकृष्ट होतात , वाहवा मिळते , लौकिक वाढतो आणि त्यापलीकडे याचा उपयोग नाही . देहबुद्धी ते आत्मबुद्धी या पारमार्थिक...