जनीं भोजनीं नाम वाचे वदावे । अती आदरे गद्यघोषे म्हणावे ॥ हरीचिंतने अन्न सेवीत जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ ८९ ॥ पूर्वी एक शिस्त / पद्धत होती - की जेवायला पान ( ताट ) घ्यायच्या आधी आपापल्या जागेवर बसायचं ( एका हाकेमध्ये !). आईने केलेले सर्व चविष्ट पदार्थ वाढून झाल्यावर , घरातील मोठे नवेद्य दाखवणार - सण असो वा नसो . नवेद्य दाखवल्याशिवाय खायला सुरुवात करायची नाही आणि जेवताना भाजीमध्ये मीठ / तिखट कमी - जास्त काहीही झालं असेल तरी तोंडातून तक्रारीचा सूर काढायचा नाही आणि पानामध्ये काहीही टाकायचं नाही . ‘ अन्नदाता सुखी भव” म्हणूनच पानावरून उठायचं ! सत्यनारायणाचा प्रसाद ‘ वेगळाच का लागतो - नेहमीच्या गोडाच्या शिऱ्यापेक्षा ? किंवा आपण कितीही मोठे झालो तरी घरचा गरम - गरम वरणभात ( वरून तूप आणि लिंबू घातलेला ) का चविष्ट लागतो ? कधीतरी हॉटेलमध्ये खायला छान वाटतं पण ज्या लोकांवर रोज हॉटेलमध्ये खायची वेळ येते त्यांना विचारा तेथील जेवण कसं लागतं ते ! अन्न ब...