मना पाविजे सर्वही सूख जेथे । अती आदरे ठेविजे लक्ष तेथे ॥ विविके कुडी कल्पना पालटीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४० ॥ मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ? काय पुण्य असलं की ते घरबसल्या मिळतं देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो हवंय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं प्रशांत दामले यांनी गायलेले हे गीत तुम्ही ऐकले असेलच . त्यात जे “ सुख ” आहे ते आपण अनुभवलं असेल पण सुखाची नक्की व्याख्या काय ? गाण्यात सांगितलेले सुख आणि समर्थांना अभिप्रेत असलेलं सुख एकदम विरुद्ध आहे . कसं ते आपण बघूया - एखादी परीक्षा उत्तीर्ण झालो की मनाला उभारी येते . कुणाशी छान गप्पा मारल्या की एक नवी ऊर्जा मिळते . आणि अशाच घटनांच्या शृंखलेतून आनंद मिळत जातो . ज्या क्षणाला असा आनंद मिळतो , तो क्षण खरा सुखाचा धनी ! तो क्षण आपला . एखादी अवघड गोष्ट ठरवून , कष्ट घेऊन हासिल केल्यानंतर जी भावना मनात उचंबळते तिला ...