मना सज्जना भक्तिपंथेची जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे । जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥ सकाळची प्रसन्न वेळ , सडारांगोळीने शृंगारलेले अंगण आणि त्या अंगणातील तुळशीच्या पवित्र वृंदावनाजवळ उभे राहून समर्थांसारखा तेजःपुंज , वैराग्यसंपन्न , योगीराज , मेघासारख्या करुणागंभीर आवाजात या मनाच्या श्लोकांची साद घालीत असतील, त्यावेळी क्वचितच एखादे घर असेल जिथे भिक्षा मिळत नसेल . काय भाग्यवान असतील ती लोकं ज्यांच्या घरी समर्थ स्वतः जाऊन श्लोक म्हणत असतील आणि त्यांना भिक्षा घालण्याचे पुण्य मिळाले असेल . माझे पूर्वज किंवा कदाचित मी सुद्धा मागच्या जन्मी नक्कीच त्या भाग्यवानांमध्ये असेल कारण वेळेच्या पुण्याई मुळेच मनाच्या श्लोकांनी मला अक्षरशः वेडं केलं आहे . त्या पुण्याई मुळेच दासननवमी २०२० च्या उत्सवा च्या काळात समर्थांनी योगेश बुआ रामदासी आणि रेणुकादास रामदासी यांच्या मार्फत पोस्टाने दासबोध घरपोच पाठव...