मना वासना दुष्ट कामा न ये रे । मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥ मना सर्वथा नीति सोडूं नको हो। मना अंतरीं सार वीचार राहो ॥४॥ आपण बागेमध्ये फिरत आहोत आणि आपली नजर एका सुंदर फुलावर पडते . त्या फुलाला पाहताक्षणीच आपला चेहरा एकदम खुलतो , टवटवीत होतो , अगदी त्या फुलासारखा ! कारण त्या फुलाला पाहताक्षणीच आपल्या मनात विचार येतो की , खरंच हे फूल किती सुंदर आहे . त्याचा रंग व सुगंधदेखील आपल्याला मोहून टाकतो . त्यामुळे मन प्रसन्न होते आणि बागेतली फुल बघत काही वेळ आनंदात जातो. जसा सुंदर गोष्टी बघून वेळ आनंदात जातो तसेच एखादा अपघात बघितला तर त्याचे विचार मनात कित्येक तास राहतात , दिवस भर तो अपघात डोळ्यासमोरून जात नाही . थोडक्यात समोर असलेले दृश्य बदलले तरीसुद्धा मनात विचार तसेच पूर्वीचेच राहतात आणि त्याचा परिणाम आपल्या वागण्यावर होतो. याचे उलट सुद्धा होते ,मनात विचार आले की त्या प्रमाणे आपल्या हातून कृती होत जाते . म्हणून समर्थ इथे म्हणतात दुष्ट वासना ,किंवा वाईट कृत्य करावी असे मनात येऊ देऊ नको. कारण विचार आले की तशा भावना जागृत हो...