भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे। परी सर्वही स्वस्वरुपी न साहे॥ मना भासले सर्व काही पहावे। परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८७॥ भुते = इतर प्राणी पिंड = आपला देह / शरीर ब्रह्मांड = universe स्वस्वरूपी = अंतरात्मा पिंडी तेच ब्रह्मांडी असे आपण नेहेमी म्हणतो त्याचा अर्थ सांगणारा हा श्लोक . कसे ते बघूया. आपला देह अनेक अवयवांनी बनलेला आहे. प्रत्येक अववयात अनेक TISSUES आहेत. प्रत्येक टिशूमध्ये प्रचंड प्रमाणात BIOLOGICAL CELLS (सेल्स) आहेत. सेल्स या शरिराचा अत्यंत सूक्ष्म व शेवटचा भाग समजला गेला आहे. हे सेल्स साध्या डोळ्यांनी दिसणे अशक्य आहे. प्रत्येक जीवंत शरीराचे जे नैसर्गिक कार्य असते तेच कार्य हा प्रत्येक CELL करत असतो. ते कार्य म्हणजे श्वासोच्छवास (Respiration) पुर्नउत्पादन (Reproduction) आणि प्रतिक्रिया (Reaction). बाकी इतर गुणधर्म हे सारे संपूर्णपणे त्या अवयवांच्या एका छोट्याशा (Cell) सेल्स मध्येही प्रतिबींबित होतात. म्हणजे जे नैसर्गिक कार्य शरीर करते तेच कार्य ती से...