जनी सांगतां ऐकतां जन्म गेला । परी वादवेवाद तैसाचि
ठेला ॥
उठे संशयो वाद हा दंभधारी । तुटे वाद संवाद तो हितकारी
॥ ११२ ॥
वाल्मीकि-
व्यास यांच्यापासून ते ज्ञानेश्वर-तुकाराम-रामदास यांच्यापर्यंत किंवा त्यानंतर गोंदवलेकर
महाराज, श्रीधर स्वामी किंवा पूज्य बाबा बेलसरे यांच्या पर्यंत यांच्यापर्यंत अनेक
थोरामोठ्यांनी चांगलें काय, हिताचे काय तें सांगितलें. अनेक ग्रंथ लिहिले, प्रवचने
आणि किर्तने केली. मधुर-रसाळ अभंग लिहिले . काही कठोर पाने सांगितले कधी समजुतदार पणे
सांगितलें. गोंडवेलंकर गोंदवलेकर महाराज यांनी शेवटचे खंत बोलून दाखवली "सगळे
हिंग जिऱ्याचे गिऱ्हाईक आहेत, कस्तुरी साठी कोणीच येत नाही ". त्यांनी निरसनाकरितां
केलेले वादविवाद जिथल्या तिथे, जसेच्या तसेच राहिले आणि ते निघून गेले .हे सगळे थोर
महात्मे स्वतःपुरते तरी मुक्त होते, कोणी बद्ध जीव नव्हते. ते लोककल्याणासाठी अवतार
घेऊन आले होते. आपलें कार्य संपताच निघून गेले. भगवंताशी एकरूप झाले. इतर बापडे ऐकणारे
तर काय पण त्यांचे वाचून सांगणारेहि ठिकच्याठिकाणीं राहिले. अनेक कीर्तनकार, प्रवचनकार,
पुराणिक, व्याख्याते उभे आयुष्य व्याख्यान- प्रवचनांत घालवितात आणि प्रत्येक जण स्वतःच्या
बुद्धीनुसार सांगतात . त्यांना श्रोतेहि कधी पाच तर कधी हजारो असतात पण शेवटीं परिणामकाय ? जवळ-जवळ कांहींच नाहीं. प्रत्येकाची
अध्यात्मिक परिस्थिती आहे तशीच ? प्रगती अगदी नगण्य. सांगणारा बिदागी च्या पाकिटात
किती रक्कम आहे यावर डोळा ठेवतो आणि ऐकणारा फुकटात चांगला वेळ जातो वा बरी करमणूक होते
म्हणून ऐकणार किंवा वाचणार संतांच्या कथा आणि
त्यांची शिकवण जो सांगतो त्याला अनुभव नाही. ऐकणाराला जिज्ञासा नाही. हें असें सांगणे-ऐकणे
काय कामाचे ? सांगणारे खूप असतात. काही चांगले, काही वाईट, कोणी अभ्यासपूर्ण बोलणारे
तर कोणी उथळ, केवळ वरवरचे ज्ञान असलेले. नाना प्रकारचे लोक आणि त्यांचे नाना प्रकारचे
उपदेश. पण प्रत्यक्ष अनुभव फारच कमी जणांकडे आणि अध्यात्मिक प्रगती काहीच होत नाही
. बोलणारा बोलत असतो आणि ऐकणारे एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात.
स्वतः काहीही अनुभव नसतांना ब्लॉग लिहिणारे (माझ्या सारखे) आणि व्हॅट्सअप वर
अध्यात्मिक लेख पाठवणारे सुद्धा
याच गटात येतात. म्हणून समर्थांनी इथे सावध केले आणि कानपिचक्या दिल्या
आहेत . ( जनी सांगतां ऐकतां जन्म
गेला । परी वादवेवाद तैसाचि ठेला ॥)
काही लोक एकच शंका, वेगवेगळ्या निरूपण
करांना विचारतात , शंका त्याच त्या आणि निरूपणात सांगितलेल्या असतात , पण मुद्दाम सगळ्यांच्या
नजरेत भरावे म्हणून विचारणारे असतात . वक्त्याला कोंडीत पकडणे हा सुद्धा उद्देश असू
शकतो. उदाहरणार्थ १) ईश्वर आहे कां ? आहे तर
अनुभव कां येत नाहीं ? २) चांगले वागूनहि दुःख कां भोगावे लागतें ? ३) प्रारब्ध असेल
तर प्रयत्नाला अर्थ काय ? ४) पूजापाठांत मन लागत नाहीं काय करावें ? ५) धार्मिक दिसणारा
मनुष्यहि सदाचारी कां नसतो ? ६) मन एकाग्र कां होत नाहीं ? ७) जीवब्रह्माचें ऐक्य कसें
? इत्यादि. काही लोक श्री गोंदवलेकर महाराजांना
असे मुद्दाम प्रश्न विचारात . ते कधी आपल्या न्हाव्याला पुढे करायचे, कधी लहान
मुलीला पुढे करायचे . त्यांना म्हणायचे या प्रश्नाचे उत्तर तर ही लहान मुलगी देऊ शकेल
. त्यात काय ? एकदा पूज्य बाबा बेलसरे यांना एका साधकाने विचारले की गीता अर्जुनाला
सांगितली नाही असे त्यांच्या वाचनात आले. अशी
शंका विचारली तर पूज्य बाबा बेलसरे यांनी एक प्रतिप्रश्न केला "नाम घेण्यात याने
काही अडचण निर्माण होते आहे का ? " प्रश्न विचारण्याचा दंभ या प्रश्नात दिसत असेल
तर दुसरे कोणते उत्तर देणार थोर पूज्य बाबा बेलसरे. खऱ्या जिज्ञासूचे समाधान होईल पण
‘शंका’सुराचे समाधान होणे अशक्य. वाजवी शंका विचारणे आणि तिचे निरसन करून घेणे हा
श्रोत्याचा हक्क असतो. पण जर तसे निरसन वक्त्याकडून होत नसेल तर त्यावेळेपुरती माघार
घेऊन दुसऱ्या एखाद्या जास्त ज्ञान असलेल्याला विचारावे, अखंड वितंडवाद घालत बसू नये
हे पथ्य पाळणे परस्परांत वाद टाळून सुसंवाद
साधण्यासाठी आवश्यक असते. हितकारक असते. उठे संशयो वाद हा दंभधारी । तुटे वाद संवाद तो हितकारी ॥ ११२ ॥
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

