भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे । भ यातीत ते संत आनंत पाहे ॥ ज या पाहता द्वैत काही दिसेना । भयो मानसी सर्वथाही असेना ॥ १३६ ॥ विमानात ब्लॅकबॉक्स असतो आणि accident झाल्यावर शेवटच्या काही तासात नक्की काय झाले या साठी त्याचा उपयोग करतात . आपल्या शरीरात असा एक ब्लॅकबॉक्स म्हणजेच मन . कोणाच्याही मनात कोणत्याही वेळी डोकावून बघीतले तर त्यात एकच दिसेल ते म्हणजे भय . कशाचे भय ? विषयांच्या अतिसेवनाच्या (LIFESTYLE ) मुळे भयंकर रोग होण्याची भीती , संपत्ती असल्यास आयकर खात्याचे भय , कुलवंतांना कुळाची अब्रू जाण्याच भय , सन्मान मिळाला तर तो कसा टिकवावा याचे भय . राजकारणी आणि बलवानाला आपल्यापेक्षा अधिक बलशाली शत्रूचे भय , सौंदर्यवतीला वार्धक्याचे , पंडिताला दुसऱ्या पंडिताशी वादात हरण्याचे , गुणवंताला एखाद्या वेळी पाय घसरण्याची भीती , तर शरीराला मृत्यूचे भय . काय काय सांगू ? थोडक्यात सर्वच गोष्टी भयकारक आहेत . केवळ वैराग्य असलेलाच निर्भय असू शकतो असे समर्थ म्हण...