अनुक्रमणिका

|| भये व्यापिले सर्व ब्रह्मांड ...भयो मानसी सर्वथाही असेना ॥ १३६ ॥ अहो ज्या नरा रामविश्वास ....वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८ ॥ गणाधीश जो ईश सर्वा ....गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥ जगीं पाहतां साच तें काय ...भ्रमे भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ॥ १४४ ॥ जनी सांगतां ऐकतां जन्म ..... तुटे वाद संवाद तो हितकारी ॥ ११२ ॥ जनीं भोजनीं नाम वाचे वदावे .....तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ ८९ ॥ जनीं सर्वसूखी असा कोण ....त्यासारखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥ जिवा कर्मयोगे जनीं जन्म....कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥ जेणें मक्षिका भक्षिली ...तया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना।। १५९।। तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले....गुरूवीण तो सर्वथा ही न दीसे ||१७९ ||
धुरू लेकरूं बापुडे ....नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७ ॥ न ये राम वाणी तया थोर ...बहू आगळें बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥ नको रे मना वाद हा ....अहंभाव जो राहिला तूजपासी॥१६०॥ नव्हे कर्म ना धर्म ना.......प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥ प्रभाते मनीं राम चिंतीत ..जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥ फुकाचे मुखी बोलता काय ...विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ॥ ११४ ॥ बहू शास्त्र धुंडाळितां वाड ...गती खुंटती ज्ञानबोधें प्रबोधें ॥ १५७ ॥ बहू हिंपुटी होईजे ....अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २० ॥ बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा.....समस्तांमधे एक ते आगळे रे || १५२ }} भजावा जनीं पाहता राम एकू .....धरा जानकीनायकाचा विवेकू ॥ १३१ ॥ भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे......परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८७॥ मना पापसंकल्प सोडूनि ....विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥ मना पाविजे सर्वही सूख .....मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४० || मना मानसीं दुःख ... विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥ मना वासना दुष्ट कामा .. मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥ मना वासना वासुदेवीं.....मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे ॥ १२८ ॥ मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे......मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥ मना सज्जना भक्तिपंथेची ....जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥. मुखी राम त्या काम बाधू शकेना.......जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८७ ॥ सदा सर्वदा देव सन्नीध आहे....नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥ shlok 001 to 010
अधिक दर्शवा

 


सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा । 

उडी घालितो संकटी स्वामि तैसा

हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी  

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ३७

मी कोण आहे याचे उत्तर आपल्याला कळात नाही जो पर्यंत आपल्याला भगवंताची भेट होत नाही. सध्या आपल्याला मी म्हणजे देह अशीच ओळख आहे. मी म्हणजे देह असे वाटते त्याला देहबुद्धी म्हणतात . पण खरा मी देह नसून मी आत्मा आहे हे समजणे म्हणजे आत्मज्ञान होणे, म्हणजेच माझी आणि परमात्म्याची भेट होणे .म्हणजे जिवाची आणि शिवाजी भेट होणे. प्रत्येकाच्या आत  मध्ये भगवंताचा अंश आहे आणि त्याला  ईश्वराची भेटायची ओढ लागली आहे आणि त्यातच शाश्वत सुख आहे हे आपल्याला माहित आहे. पण प्रपंच्या च्या रहाट गाडग्यात आपल्याला त्याचा विसर पडला आहे . आपण शाश्वत सुखाच्या मागे लागतो म्हणून प्रत्येक वेळेस आपण विचार करतो की ही सुखी परिस्थिती , आता मिळणारा आनंद , हे बांधलेलं घर, ही नवीन गाडी , ही नवीन वस्तू, हे सुख किती टिकेल असा प्रश्न आपल्याला नेहेमी पडत असतो. आणि ते कायम टिकावे हीच इचछा असते .  ते शाश्वत सुखाच्या शोधार्थ आपण प्रपंच करतो आणि ते सुख विषयात शोधतो . कितीही विषय उपभोगले तरी ते मिळत  नाही म्हणून आपण कायम असमाधानी आणि कासावीस असतो . जो पर्यंत आपण आपण जिथून आलो त्या भगवंताशी आपली भेट होत नाही तो पर्यंत आपण असमाधानीच राहणार , ते असमाधान कसे असते ते सांगायला समर्थ इथे दोन चक्रवाक नर मादी पक्ष्यांचे उदाहरण देत आहेत. चक्रवाक आणि चक्रवाकी  दोघेही  रात्रभर एकमेकांस आर्ततेने साद घालत बसलेले असतात. ते वस्तुत: एकाच झाडावर  बसलेले असतात पण झाडाची पाने  दोघांच्या मध्ये आल्याने अंधारात ते एकमेकांस पाहू शकत नाहीत. त्याना तसा शाप मिळालेला आहे. हा थोडास काय तो विरह कर्तव्यप्राप्त म्हणून बिचारी मादी सोसत बसते . या फांदीवरून त्या फांदीवर फिरतात आणि एकमेकांना रात्रभर शोधात असतात. पण त्यांचा हा भ्रम सकाळी दिनमणि सूर्य उगवल्यावर दूर होऊन त्यांचे मीलन होते. इथे जसा सूर्य सकाळी त्या दोघांचा साह्यकर्ता बनून येतो तसा आपल्या साठी भगवंत शाश्वत सुख घेऊन येतो. सूर्योदय झाल्यामुळे जसा चक्रवाक पक्ष्यांचे मिलन होते, आणि ते आनंदी होतात तसेच भगवंत आणि भक्त यांची भेट झाली की भक्ताला आत्मज्ञान होते आणि त्याला तो शोधात असलेला शाश्वत आनंद मिळतो सदा (चक्रवाकासि मार्तंड जैसा । उडी घालितो संकटी स्वामि तैसा)

पण भगवंताला प्रसन्न करण्यासाठी आपण हरीची मनोभावे भक्ती करणे गरजेचे आहे. परमेश्वराला शरण जाऊन 'मला तुला भेटायचे आहे प्रार्थना करावी. मनाला पहिल्याने थोडी बळजबरी करावी लागेल. लहान मुलांना शाळेत जाण्याकरिता सुरुवातीला थोडी बळजबरी करावी लागते. आपण थोडा तरी नियम करावा. उदाहरणार्थ, जेवायच्या आधी, रात्री निजताना, सकाळी उठताना नाम घ्यायचेच; भगवंताची आठवण करायचीच. असे केले तर ते आयुष्यात उपयोगी पडेल. प्रपंचाचा प्रयत् आज जो चालू आहे तसाच करीत जावा, पण 'मला भगवंत हवा' असे म्हणत जावे. मनामध्ये भगवंताची आस ठेवावी, म्हणजे हळूहळू ती वाढत जाईल, आणि तिचे पर्यवसान ध्यासामध्ये होईल. इतका ध्यास लागेल आणि त्याचे भक्ती मध्ये रूपांतार होईल. द्रोणाचार्यानी सगळ्या शिष्यांना विचारले की तुम्हाला प्रत्येकाला आता समोर काय दिसते आहे ?  एक शिष्य म्हणाला मला झाड दिसते आहे , दुसरा म्हणाला मला पक्षी दिसतो आहे , कोणी महाल फंड, पाने, पक्षी दिसतो आहे पण फक्त अर्जुना ने सांगितले की मला पक्ष्याचा डोळा दिसतो आहे कारण माझे निशाण तेच आहे . तसे भक्ताचे निशाण फक्त भगवंतचे दर्शन हेच असावे आणि त्यासाठी हरी भक्तीचा मार्ग घाव बरोबर त्या ठिकाणी घातला पाहिजे. "निशाणीचा" अजून एक अर्थ असा काही जणांनी वेगळा अर्थ सांगितला आहे. निस्सान नावाचे नगाऱ्या सारखे वाद्य आहे. त्यावर हरिभक्तीची टिपरी बरोबर ठिकाणी मारली की आवाज येणारच . भक्ताचा सार्थ अभिमान बाळगण्याचा गुणही रामामध्ये आहे आणि त्यामुळेच तो आपल्या सच्च्या भक्ताची, दासाची उपेक्षा कधी करत नाही, उद्धाराचा मार्ग दाखवतो, त्याला भेटायला तितकेच आतुर असतो  ( हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी )

राम शस्त्र आणि बळाचा वापर करून भक्ताचे रक्षण करतो,  तिन्ही लोकात भक्ताच्या केसाला सुद्धा कोणीही धक्का लावू शकत नाही , देवांना सुद्धा सौडवून आणण्याची ताकद रामामध्ये  आहे , चुकीच्या मार्गाने गेलेल्या भक्ताला पश्चाताप झाला असेल तर राम उद्धरून नेऊ शकतो, भक्ताजी काळजी करणारा आणि त्याच्या सगळ्या चिंता स्वतः सोडवून त्याला चिंतामुक्त करणारा असा राम, भक्ताच्या मनात प्रेम असेल तर राम नक्कीच त्याला प्रसन्न होतो पण त्याच्या बद्दल घृणा असेल तर तो सुद्धा ठकास महाठक असे वागू शकतो , छोट्या मोठ्या प्रसंगातून भक्तांची परीक्षा बघणारा ,आपल्या शेजारीच असतो  , प्रेमी युगल जसे  एकमेकांना भेटायला आसुसलेले असतात तसा राम आपल्या भक्ताला भेटायला आतुर असतो अशा अनेक प्रकारे समर्थ आपल्याला रामाचे गुण आणि भक्तीचे महात्म्य समजावून सांगत आहेत. पण आपण त्यातून किती शिकणार आहोत आणि आचरणात आणतो ते आपल्यावर अवलंबून आहे

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मना मानसीं दुःख आणू नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥ विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी । विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी