भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे।
परी सर्वही स्वस्वरुपी न साहे॥
मना भासले सर्व काही पहावे।
परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८७॥
भुते = इतर प्राणी पिंड = आपला देह / शरीर ब्रह्मांड =
universe स्वस्वरूपी = अंतरात्मा
पिंडी तेच ब्रह्मांडी असे आपण नेहेमी म्हणतो त्याचा अर्थ सांगणारा हा श्लोक. कसे ते बघूया. आपला देह अनेक अवयवांनी
बनलेला आहे. प्रत्येक अववयात अनेक TISSUES आहेत. प्रत्येक टिशूमध्ये प्रचंड प्रमाणात
BIOLOGICAL CELLS (सेल्स) आहेत. सेल्स या शरिराचा अत्यंत सूक्ष्म व शेवटचा भाग समजला
गेला आहे. हे सेल्स साध्या डोळ्यांनी दिसणे अशक्य आहे. प्रत्येक जीवंत शरीराचे जे नैसर्गिक
कार्य असते तेच कार्य हा प्रत्येक CELL करत असतो. ते कार्य म्हणजे श्वासोच्छवास
(Respiration) पुर्नउत्पादन (Reproduction) आणि प्रतिक्रिया (Reaction). बाकी इतर गुणधर्म
हे सारे संपूर्णपणे त्या अवयवांच्या एका छोट्याशा (Cell) सेल्स मध्येही प्रतिबींबित
होतात. म्हणजे जे नैसर्गिक कार्य शरीर करते तेच कार्य ती सेल्स स्वतंत्रपणे करते. ऊर्जा
मिळवणे, तयार करणे व तीचा उपयोग करणे. ब्रह्मात सुद्धा कायम तेच सुरु असते. त्याच्या
मागे सुद्धा परमात्मा आहे. जो परमात्मा त्या छोट्या Cell मध्ये ऊर्जा किंवा चैतन्य
निर्माण
करतो. त्यालाच परमात्मा (GOD) म्हणतात.
G-GENERATION
O-OPERATION D-DESTRUCTION अजून पुढे जाऊन सूक्ष्म नजरेने जर विचार केला
तर प्रत्येक प्राण्यामध्ये (भुते) अशीच अनेक सेल्स असतात. आणि त्याच धरतीवर त्याच पद्धतीने
प्रत्येक कार्य व त्याचा कार्यभाव हा त्या प्राण्याच्या छोट्याशा सेल्समध्ये पण होत
असल्याचे प्रखरतेने जाणवते.
संपूर्ण विश्वाच्या हालचाली केवळ त्या सेल्समध्ये प्रतीत करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंता मध्येच असते. त्या वरून परमात्म्याची महानता, कल्पकता, योग्यता आणि दिव्यता किती असेल हे आपल्या कल्पना शक्तीच्या पलीकडे आहे. जे सेल्स सजीव प्राण्यांमध्ये असतात तसेच निर्जीव वस्तूंमध्ये
सूक्ष्म परमाणू (ATOM) (निर्जीव) असतात. देहाच्या सेल्सचे अर्थात सूक्ष्म घटकाचे, देहाचे, जगाचे आणि प्रचंड अशा विश्वाचे, एक विलक्षण नाते संबंध असल्याचे जाणवते.
गंभीर विचारांनी चिंतन केल्यास त्यातील सत्य लक्षात येते. सजीवामधील सूक्ष्म घटक सेल्स आणि निर्जीव पदार्थामधला सूक्ष्म घटक अणू हे होय. सेल्स व अणू ऊर्जा निर्मीतीचे स्त्रोत आहेत. त्यांच्या स्थरावर सतत ऊर्जा निर्माण होते. म्हणजेच तो परमात्मा आपल्या
दिव्य शक्ती रुपाने चरा चरामध्ये सर्वत्र भरलेला आहे. आता हा प्रत्येक CELL शेवटी पंचमहाभूतांपासून
तयार झालेला आहे हे दृष्य विश्व पंचमहाभूतांचे
आहे. १)पृथ्वी, २)आप (पाणी),३)तेज (उष्णता) ४) वायू, ५)आकाश, या पंचभौतिक प्रकृतीत
तीन गुण १) सत्व,२) रज, ३) तम या पासून ब्रह्मांडाची निर्मिती झाली. प्रत्येक प्राणी मात्रांचे शरीर
हे सुद्धा त्यानेच बनलेले आहे. आपल्याला दिसणारे हे ब्रह्मांड म्हणजे आकाशातील ग्रह, तारका, भूमी, झाडेयाची निर्मिती
पंच महाभूतांपासून झाली आहे. सगळे प्राणी(भुते)
आणि आपण स्वतः म्हणजे – पिंड. आता हा आपला देह देखील पंचमहाभूतांच्या संयोगातून बनलेला
आहे. कारण मृत्यू झाला की देह आणि आत्मा विलग होतात. आपला देहा त्यावेळेस राख, ज्वाला,
बाष्प, वायु अशा स्वरूपात पंचमहाभूतांमध्ये विलीन होऊन जात असतो. म्हणजेच देह, पंचमहाभूते
आणि ब्रह्मांड यांच्यातले ऐक्य आहे. कोणतीही वस्तू नाश पावते त्यावेळेस त्याचे रूपांतर
याच पंच महाभुतांमध्येच होते. तेच समर्थ पहिल्या ओवीत सांगत आहेत भुते पिंड ब्रह्मांड
हे ऐक्य आहे. परंतु ब्रह्मांड, पिंड आणि भूत यांचे ऐक्य असले आणि प्रत्येकाच्या मागे परमात्मा असला तरी तो मूळ स्वरूपात आपल्याला दिसत नाही. तो पडद्याच्या मागे असतो पण आपल्या खऱ्या स्वरूपात येत नाही.
असे असले तरी जर आत्मास्वरुपाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तेथे त्रिगुण किंवा पंचमहाभूते यांचा काहीही उपयोग नाही कारण आत्माराम या पंचमहाभूतांच्या पलीकडे आहेत. ईश्वर निर्मित ही सृष्टी खरी नाही तो खरा भ्रम आहे . म्हणजेच भास आहे असे मानतात . त्यालाच माया असे म्हणतात. माया नश्वर आहे . असे हे सृष्टीचे खरे स्वरूप काय आहे हे आपल्याला कळते तेव्हा आपण या दृश्य विश्वात भावना गुंतून पडू नये हे समर्थांना या श्लोकातून सांगायचे आहे. या सृष्टीकडे पहावे आणि
त्यांच्याबाबतची ममत्वाची, हव्यासाची भावना सोडून देऊन, नि:संगपणे रहावे यातच सुख आहे.
या श्लोकातून कोणी “जे दिसते आहे ते निमुटपणे पहावे आणि ‘आपला त्याच्याशी काय संबंध? आपल्याला काय कारायचंय त्याच्याशी?’ अशी भावना ठेवून निवांतपणे आपले जीवन आपण जगत रहावे असा निष्कर्ष कोणी काढील तर ते चुकीचे आहे. कारण अशा जगण्यात निरिच्छपणा, नि:संगवृत्ती नाही तर फक्त आपल्याच जीवनाबाबत आत्मकेंद्रित होऊन रहावे ही प्रवृत्ती आहे. आणि समर्थ अशा प्रवृत्तीचा अंगीकार करायला सांगत नाहीत. संग सोडून सुखी राहावे म्हणजे मोह, माया, लोभ, टाळून शांत, स्थिरचित्त होऊन रहावे.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
