अनुक्रमणिका

|| भये व्यापिले सर्व ब्रह्मांड ...भयो मानसी सर्वथाही असेना ॥ १३६ ॥ अहो ज्या नरा रामविश्वास ....वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८ ॥ गणाधीश जो ईश सर्वा ....गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥ जगीं पाहतां साच तें काय ...भ्रमे भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ॥ १४४ ॥ जनी सांगतां ऐकतां जन्म ..... तुटे वाद संवाद तो हितकारी ॥ ११२ ॥ जनीं भोजनीं नाम वाचे वदावे .....तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ ८९ ॥ जनीं सर्वसूखी असा कोण ....त्यासारखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥ जिवा कर्मयोगे जनीं जन्म....कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥ जेणें मक्षिका भक्षिली ...तया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना।। १५९।। तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले....गुरूवीण तो सर्वथा ही न दीसे ||१७९ ||
धुरू लेकरूं बापुडे ....नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७ ॥ न ये राम वाणी तया थोर ...बहू आगळें बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥ नको रे मना वाद हा ....अहंभाव जो राहिला तूजपासी॥१६०॥ नव्हे कर्म ना धर्म ना.......प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥ प्रभाते मनीं राम चिंतीत ..जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥ फुकाचे मुखी बोलता काय ...विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ॥ ११४ ॥ बहू शास्त्र धुंडाळितां वाड ...गती खुंटती ज्ञानबोधें प्रबोधें ॥ १५७ ॥ बहू हिंपुटी होईजे ....अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २० ॥ बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा.....समस्तांमधे एक ते आगळे रे || १५२ }} भजावा जनीं पाहता राम एकू .....धरा जानकीनायकाचा विवेकू ॥ १३१ ॥ भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे......परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८७॥ मना पापसंकल्प सोडूनि ....विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥ मना पाविजे सर्वही सूख .....मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४० || मना मानसीं दुःख ... विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥ मना वासना दुष्ट कामा .. मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥ मना वासना वासुदेवीं.....मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे ॥ १२८ ॥ मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे......मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥ मना सज्जना भक्तिपंथेची ....जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥. मुखी राम त्या काम बाधू शकेना.......जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८७ ॥ सदा सर्वदा देव सन्नीध आहे....नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥ shlok 001 to 010
अधिक दर्शवा

 



बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा। 

परी अंतरी पाहिजे तो निवाडा॥

मना सार साचार ते वेगळे रे। 

समस्तांमधे एक ते आगळे रे॥१५२॥


अमेरिकेची यात्रा म्हणजे विवेकानंदांचे एक विलक्षण साहसच होते.. अमेरिकेत कुठेतरी, केव्हातरी एक सर्वधर्मपरिषद होणार आहे, एवढंच त्यांनी अस्पष्टपणे ऐकलेलं होतं. या परिषदेबद्दलची निश्चित आणि तपशीलवार माहिती मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी, त्यांचे शिष्य, भारतीय मित्र, विद्यार्थी, पंडित, मंत्री किंवा महाराजांनी कुणीही केली नव्हता. तरीही हा तरुण स्वामी त्या परिषदेस जाण्यास निघाला होता. सर्वधर्म परिषद सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात असून प्रतिनिधी म्हणून नाव नोंदणीची तारीख निघून गेल्याचं त्यांना कळालं. मान्यताप्राप्त धार्मिक संस्थेचे ओळखपत्र असल्याशिवाय प्रतिनिधी म्हणून कोणाचंही नाव स्वीकारलं जाणार नसल्याचंही माहीत झालं. आकर्षक देहयष्टीमुळं विवेकानंद कुठंही जात असले, तरी लोकांच्या नजरेतून सुटत नसत. बोस्टनच्या गाडीतच मॅसेच्युसेट्स इथल्या एका श्रीमंत महिलेशी त्यांचा संवाद सुरू होता. महिलेनं विवेकानंदांना आपल्या घरी राहण्यास बोलावलं. इथंच विवेकानंदांची हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक जे. एच. राइट यांच्याशी ओळख झाली. जॉन  राइट हा स्वतः सुद्धा खूप मोठा विद्वान होता. विवेकानंद यांच्या पेक्षा त्याचा तत्वज्ञानाचा अभ्यास खूपच दांडगा होता . त्याने अनेक प्रबंध लिहिले होते . विवेकानंद त्याच्या पेक्षा कमी शिकलेले होते ग्रंथ पण त्यांच्या प्रत्येक मुद्द्याचा मागे अनुभवाचे पाठबळ होते. जॉन  राइट यांची विद्वात्ता पुस्तकी होती पण त्याला अनुभवाचे नव्हते . परमार्थ क्षेत्रात किंवा कोणत्याही गहन विषयावर बोलणाऱ्या व्यक्तीच्या अंतःकरणात conviction असेल तरच ते समोरच्याला लगेच पटते आणि त्यांच्या ह्रदयाला भिडते. २५ ऑगस्ट १८९३ ते २८ ऑगस्ट १८९३ स्वामी त्याच्या घरी राहिले. दोन दिवसात तो स्वामींच्या विचाराने इतका प्रभावित झाला की त्याने स्वतः धर्म परिषदेच्या संचालक मंडळींना पत्र लिहिले . त्यात हे वाक्य त्याने लिहिले "Here is a man who is more learned than all our learned professors put together". अखेर धर्म परिषदचा -११ सप्टेंबरचा १८९३ दिवस उजाडला. सर्वधर्म परिषदेच्या अधिवेशनास प्रारंभ झाला. मंचावर आपला जुना मित्र ब्राम्हो समाजाचा प्रमुख प्रतापचंद्र मुजुमदार हाही असल्याचं विवेकानंदांना इथंच कळालं. मुजुमदार हे सर्व भारतीय ईश्वरवादी गटांचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते. बोलण्यासाठी एकएकाचे नंबर येत होते. यात मोठा वेळ गेला. अनेक मोठ्या विद्वानांनी आपले मत अगदी मुद्देसूद रीतीने पटवून द्यायचा प्रयत्न केला. अखेर विवेकानंदांची पाळी आली. आणि “अमेरिकन बहिणींनो आणि भावांनो” या भाषणाच्या सुरवातीच्या वाक्यांनीच संपूर्ण सभागृहानं विवेकानंदांना टाळ्यांच्या कडकडाटात अक्षरशः डोक्यावर घेतलं. जुनाट अंधश्रद्धा,जातीवर आधारित भेदभाव यांविषयी  त्यांनी भाषणात  प्रश्न निर्माण करून,सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टीकोन यावर आधारित असलेल्या गोष्टी स्वीकारण्याची मानसिकता स्वीकारणे कसे गरजेचे आहे ते श्रोत्यांना पटवून दिले. त्यासाठी वेदांत आणि वैदिक परंपरा यांवर निष्ठा ठेवून भारतीय संस्कृतीचे जगाला अनेक दाखले दिले. अनेक भारतीय आध्यात्मिक गुरु, चार्ल्स डार्विन, जॉन स्टुअर्ट मिल,हर्बर्ट स्पेन्सर आदि वैज्ञानिक विचारवंतांच्या विचारांचा गाढा अभ्यास करून विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय राखणारे स्वामी विवेकानंद यांचे भाषण म्हणूनच तेथील प्रत्येकाच्या ह्रदयाला भिडले. इतरांचे भाषण ऐकल्यावर लोक शांतपणे नुसतेच ऐकत होते पण स्वामींच्या भाषणाला त्यांनी उठून उभे राहून टाळ्यांचा गडगडाट केला कारण त्यामागे स्वामींची तपश्चर्येने मिळवलेला अनुभव होता. BROTHERS AND SISTERS या शब्दांच्या मागे जे सार होते ते इतरांपेक्षा आगळे वेगळे होते. त्या सभेत बरीच चर्चा झाली, धर्माविषयी आणि परब्रह्म म्हणजे नक्की काय यावर अनेक जण  बोलले , अनेक तास वादविवाद रंगले आणि त्यात काही विद्वान जिंकले पण स्वामींनी जे  मूळ सत्य वा तत्त्व साररूपाने त्या सभेत मांडले ते खरोखरीच बाकीच्यांच्या शब्दांच्या पसाऱ्यापेक्षां वेगळेच होते. स्वामी विवेकानंद आणि इतर वक्ते या मध्ये अनुभवाचा फरक होता . "Here is a man who is more learned than all our learned professors put together"  या वाक्यातून जॉन राईट यांनी जो संदेश दिला तोच समर्थांना उभा श्लोकात दिला आहे तो असा की अध्यात्मावर तत्वज्ञान झाडणाऱ्याना स्वत:लाच खरे ज्ञान नसते पण शब्दांचा फुलोरा उभा करणे यात त्यांचे कौशल्य असते. आध्यात्मिक विचारांमधील सारतत्व हे अशा फुलोऱ्यातून, पोपटपंचीतून स्पष्ट होत नसते. त्यासाठी बुद्धी वापरून, अंत:करणापासून मनन, चिंतन करून सार काय, असार काय याचा निवाडा करायला हवा. हे सारतत्व, सत्यज्ञान एकमेवाद्वितीय असते, इतर सर्व फापटपसाऱ्यापासून  वेगळेच असते


आपण या मधून स्वतः ला विचारायचे- आजवर बरीच तत्त्वचर्चा केलीस, शाब्दिक तत्त्वज्ञान खूप जमा केलंस, पण जीवनातलं सार काय, श्रेय काय, आचरण नेमकं कसं असावं, याचा निवाडा अंतरंगात साधला  गेला आहे का ?


 तत्वज्ञानाचा खूप परिश्रमपूर्वक अभ्यास केला तर तो विद्वान् म्हणून मान्यता पावेल पण साक्षात्कारी होऊं शकणार नाहीं. हें सर्व वक्तृत्वामुळें वा प्रबंधामुळें लौकिकाचे साधन ठरेल, पण त्यांतून अनुभव उपलब्ध होऊं शकणार नाहीं, त्यासाठीं अंतःकरणानेंच निवाडा व्हावयास हवा. हाच फरक स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या आधीच्या विद्वान लोकांमध्ये होता .


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मना मानसीं दुःख आणू नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥ विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी । विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी