अनुक्रमणिका

|| भये व्यापिले सर्व ब्रह्मांड ...भयो मानसी सर्वथाही असेना ॥ १३६ ॥ अहो ज्या नरा रामविश्वास ....वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८ ॥ गणाधीश जो ईश सर्वा ....गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥ जगीं पाहतां साच तें काय ...भ्रमे भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ॥ १४४ ॥ जनी सांगतां ऐकतां जन्म ..... तुटे वाद संवाद तो हितकारी ॥ ११२ ॥ जनीं भोजनीं नाम वाचे वदावे .....तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ ८९ ॥ जनीं सर्वसूखी असा कोण ....त्यासारखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥ जिवा कर्मयोगे जनीं जन्म....कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥ जेणें मक्षिका भक्षिली ...तया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना।। १५९।। तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले....गुरूवीण तो सर्वथा ही न दीसे ||१७९ ||
धुरू लेकरूं बापुडे ....नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७ ॥ न ये राम वाणी तया थोर ...बहू आगळें बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥ नको रे मना वाद हा ....अहंभाव जो राहिला तूजपासी॥१६०॥ नव्हे कर्म ना धर्म ना.......प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥ प्रभाते मनीं राम चिंतीत ..जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥ फुकाचे मुखी बोलता काय ...विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ॥ ११४ ॥ बहू शास्त्र धुंडाळितां वाड ...गती खुंटती ज्ञानबोधें प्रबोधें ॥ १५७ ॥ बहू हिंपुटी होईजे ....अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २० ॥ बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा.....समस्तांमधे एक ते आगळे रे || १५२ }} भजावा जनीं पाहता राम एकू .....धरा जानकीनायकाचा विवेकू ॥ १३१ ॥ भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे......परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८७॥ मना पापसंकल्प सोडूनि ....विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥ मना पाविजे सर्वही सूख .....मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४० || मना मानसीं दुःख ... विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥ मना वासना दुष्ट कामा .. मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥ मना वासना वासुदेवीं.....मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे ॥ १२८ ॥ मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे......मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥ मना सज्जना भक्तिपंथेची ....जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥. मुखी राम त्या काम बाधू शकेना.......जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८७ ॥ सदा सर्वदा देव सन्नीध आहे....नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥ shlok 001 to 010
अधिक दर्शवा

 



जनीं भोजनीं नाम वाचे वदावे । 
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ॥
हरीचिंतने अन्न सेवीत जावे । 
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ ८९ ॥

पूर्वी एक शिस्त/ पद्धत होती- की जेवायला पान (ताट) घ्यायच्या आधी आपापल्या जागेवर बसायचं (एका हाकेमध्ये!). आईने केलेले सर्व चविष्ट पदार्थ वाढून झाल्यावर, घरातील मोठे  नवेद्य दाखवणार- सण असो वा नसो. नवेद्य दाखवल्याशिवाय खायला सुरुवात करायची नाही आणि जेवताना भाजीमध्ये मीठ/ तिखट कमी-जास्त काहीही झालं असेल तरी तोंडातून तक्रारीचा सूर काढायचा नाही आणि पानामध्ये काहीही टाकायचं नाही. ‘अन्नदाता सुखी भव” म्हणूनच पानावरून उठायचं!  सत्यनारायणाचा प्रसादवेगळाच का लागतो- नेहमीच्या गोडाच्या शिऱ्यापेक्षा? किंवा आपण कितीही मोठे झालो तरी घरचा गरम-गरम वरणभात (वरून तूप आणि  लिंबू घातलेला) का चविष्ट लागतो? कधीतरी हॉटेलमध्ये खायला छान वाटतं पण ज्या लोकांवर रोज हॉटेलमध्ये खायची वेळ येते त्यांना विचारा तेथील  जेवण कसं लागतं ते! अन्न बनवताना दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात- आपल्या मनातील भाव आणि अन्नाचा थेट देवाशी असलेला संबंध!  म्हणून अन्न बनवताना आणि खाताना आपल्या मनामध्ये आपण अन्नदात्याविषयी कृतज्ञता बाळगली तर त्याच अन्नाचं अमृत होऊन आपण पेशींसाठी पोषक आहार देऊ शकतो. आपल्या सतर्क आणि कृतज्ञ भावाशिवाय आपण निरोगी राहू शकत नाही

आपण जे अन्न खातो त्याचा परिणाम मनावर होत असतो. त्या साठी खाली दिलेली ५ पथ्ये पाळली तर त्याचे मनावर संस्कार चांगले होतील 

१. अन्न शिजवताना मन शांत आणि प्रसन्न ठेवावे

२.  भगवंतामुळे आपल्याला हा दिवस दिसला. त्याच्यामुळेच शेतामध्ये पिकं येतात आणि फळं मिळतात ही कृतज्ञतेची भावना मनामध्ये असावी.

३. अन्नाविषयी वाईट शब्द काढू नये. अन्नाचा आदर करावा.

४. अन्नग्रहण करण्यापूर्वी करावयाची प्रार्थना- ‘हे देवा, हे अन्न तुझ्या चरणी अर्पण करून तुझा प्रसाद या भावाने मी ग्रहण करत आहे. या प्रसादातून मला शक्ती व चतन्य मिळू दे.’

५. अन्न देवाला अर्पण करा व नंतर देवाचा प्रसाद म्हणून ग्रहण करा.

६. समर्थनी दिलेला हा श्लोक म्हणावा  

जनीं भोजनी नाम वाचे वदावे। अती आदरे गद्यघोषे म्हणावे।

हरीचिंतने अन्न सेवित जावे। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ||.

पार्टी, बुफे च्या नावाखाली चप्पल, बुट घालूनच तामसी आहार घेण्यात भूषण वाटू लागल्यामुळे दिवाण खाण्यात, टिव्ही बघत किंवा संपूर्ण कपडे घालून बुटांसकट उभ्याने हातात ताट नव्हे प्लेट घेऊन भिका-यासारखे श्वान भोजन करण्यामध्ये उच्चवर्गातील असल्याचे साक्षात्कार प्रत्येकाला होऊ लागला आहे. जास्त प्रमाणात तामसी आहार म्हणजे मसाला युक्त तेलकट पदार्थ खाणे, भारतीय हवामानातील तयार होणा-या पालेभाज्या, अन्न पदार्थ खाणे म्हणजे खेडवळ असल्याचे समजून परदेशी, चायनिज, पिझ्झा, बर्गर, मांसाहारी पदार्थ जास्त प्रमाणात रस्त्यावरील गाडय़ावर, महागडय़ा हॉटेलात कसल्याही अवस्थेत खाणे म्हणजे श्रीमंताचे, प्रतिष्ठेचे खाणे समजले जाऊ लागले आहे. त्यांच्या सोबतीला मद्याचे प्रमाण तर विचारायलाच नको. हे सगळे भूषणावह प्रतिष्ठेचे मानले जाऊ लागले आहे. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करण्यामध्ये जणू स्पर्धाच लागली आहे.  त्यांच्या साठी समर्थांनी ४०० वर्ष पूर्वी लिहिलेला श्लोक फारच उपयुक्त आहे 

|| जय जय रघुवीर समर्थ ||

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मना मानसीं दुःख आणू नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥ विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी । विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी