मना पाविजे
सर्वही सूख
जेथे ।
अती आदरे
ठेविजे लक्ष
तेथे ॥
विविके
कुडी कल्पना
पालटीजे ।
मना सज्जना
राघवी वस्ति
कीजे ॥
४० ॥
मला सांगा
सुख म्हणजे
नक्की काय
असतं ? काय पुण्य
असलं की
ते घरबसल्या
मिळतं
देव देतो
तेव्हा छप्पर
फाडून देतो हवंय नको
ते म्हणणं प्रश्नच
नसतो
आपण
फक्त दोन्ही
हात भरून
घ्यायचं नुसतं
प्रशांत दामले यांनी गायलेले हे गीत
तुम्ही ऐकले असेलच. त्यात जे “सुख” आहे ते आपण अनुभवलं असेल पण सुखाची नक्की व्याख्या काय ? गाण्यात सांगितलेले सुख आणि समर्थांना अभिप्रेत असलेलं सुख एकदम विरुद्ध आहे . कसं ते आपण बघूया- एखादी परीक्षा उत्तीर्ण झालो की मनाला उभारी येते. कुणाशी छान गप्पा मारल्या की एक नवी ऊर्जा मिळते. आणि अशाच घटनांच्या शृंखलेतून आनंद मिळत जातो. ज्या क्षणाला असा आनंद मिळतो, तो क्षण खरा सुखाचा धनी! तो क्षण आपला. एखादी अवघड गोष्ट ठरवून, कष्ट घेऊन हासिल केल्यानंतर जी भावना मनात उचंबळते तिला सुख म्हणता येईल? अशा क्षणांची मालिका तयार करण्याची क्षमता मिळवणं म्हणजे सुखाची तयारी करणं असं मला वाटतं. पण त्यासाठी बाहेरील गोष्टींवर आपण अवलंबून असतो . आपल्याल्या नेहेमी आनंदाची अपेक्षा असते आणि जीवनात दुःख नष्ट व्हावे आणि सुख मिळावे असे वाटते. त्यामुळे आपण पैसा ,संपत्ती ,जमीन जुमला,स्त्रीसुख , मित्र अशा अनेक ऐहिक सुखाच्या उपभोग्य वस्तूंच्या मागे लागतो आणि त्या मिळवतो . पण त्या सगळ्या वस्तू ज्याच्या दाराशी लोळत आहेत तो माणूस तरी सुखी आहे का ? तो सुखी नसतो कारण तो माणूस जे त्याच्यापाशी नाही त्याच्या मागे लागलेला असतो आणि ती मिळाली नाही म्हणून दुखी आहे. म्हणजेच प्रत्येक माणूस ज्याच्या पाशी जे नाही त्याच्या मागे लागला आहे
सुख मानायचे ठरवले दोन वेळेला स्वतःला आणि कुटुंबाला पोटभर खायला मिळाले आणि
सगळ्यांचे आरोग्य उत्तम असले म्हणजे देखील एखादी व्यक्ती स्वतःला सुखी म्हणवून घेत
असेल. सुखाची ही भावना चिरकाल टिकणारी असते का? मला वाटते ही भावना चिरकालीन टिकणारी
नसते कारण त्या भावनेला हादरे देणार्या अडचणी प्रपंचात घडत असतातच . सुख कोणत्या गोष्टींवर अवलंबुन असते का ? आपल्याकडे जे आहे त्यात सुख शोधता यायला पाहिजे . ते सापडत नाही याचं मुख्य कारण मी माझ्या आयुष्यातले सुखाचे कण वेचायचं सोडून दुसऱ्याच्या आयुष्यातल्या सुखाचे क्षण तपासात बसतो, आणि “भला मेरी कमीज से उसकी कमीज सफेद कैसी ?” असं म्हणत स्वतःचं सुख हरवून बसतो. म्हणजेच सुख मनावर आणि विवेक बुद्धी वर आणि मनातील कल्पनेवर अवलंबून असते. वरील गाण्यात आणि परिच्छेदात
सांगितलेले सुख कशावर तरी अवलंबून आहे आणि अशा क्षणांची मालिका तयार करायला बाहेरील गोष्टींची गरज पडणार . त्यामुळे मनुष्य कधीच सुखी होऊ शकणार नाही . हेच समर्थांना या श्लोकाच्या तिसऱ्या ओवीत "विविके कुडी कल्पना पालटीजे ।" मध्ये आपल्याला सांगण्याचे आहे . कुडी कल्पना पालटीजे म्हणजे देह सुखी कि आपण सुखी अशी कल्पना बदलायला पाहिजे असे समर्थ सुचवतात
एका ज्यूं छळछावणी मध्ये एका माणसाचा छळ केल्यावरदेखील तो आनंदीच राहत असतो,
त्याला विचारल्यावर तो म्हणतो, तूम्ही माझ्या शरिराला यातना देऊ शकाल, मनाला नाही.
मी आनंदी रहायचे की नाही, हे माझे मीच ठरवणार कारण माझे सुख देहसुखावर अवलंबून नाही
आहे! आता मनातून एखादी गोष्ट काढून टाक मग मनात ठेवायचे काय ? तर राघव म्हणजे भगवंत मनात ठेव . देह बुद्धी ते आत्मबुद्धी केल्याने आपण सुखी होऊ त्यामुळे कायम आपले लक्ष अत्यंत आदरपूर्वक ( SINCERELY) भगवंता कडे असावे, त्याचेच गुणगान गायल्याने आणि त्याचे स्मरण ठेवल्याने आपल्याला सर्वसुख मिळेल असे समर्थ पहिल्या दोन ओवयांमध्ये सांगत आहेत - मना पाविजे सर्वही सूख जेथे । अती आदरे ठेविजे लक्ष तेथे ॥
समर्थ साांगतात की शाश्वत समाधान भगवांताच्या प्राप्तीनेच मिळेल आणि प्रपांचाच्या वस्तूंमधून नव्हे. ते म्हणतात, ''प्रपांचात अनेक वस्तू आहेत, पण भगवांत एकच वस्तू आहे. प्रपांचात कितीही वस्तू आणल्या तरी त्या पुऱ्या पडत नाहीत, कारण एका वस्तूच्या
आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे. पण भगवांताचे तसे नाही; भगवांताची वस्तू एकदा आणली की पुन्हा ती आणायला नको.'' आपण मात्र त्या एका भगवांताच्या प्राप्तीचा उपाय सोडून दृश्य, स्थूल प्रपांचाचा पसारा वाढववण्यातच स्वतला जुंपून घेतो. सर्व अपूर्ण वस्तू वमळून एक पूर्ण वस्तू होत नाही. म्हणून सर्व दृश्य वस्तूंमधून पूर्ण सुख मिळणार नाही. आता याचा अर्थ माणसानां प्रपांच सोडून भगवांताचा शोध घ्यावा, असां समर्थांना अभिप्रेत नाही. प्रपंच हे परमार्थ मिळवण्याचे साधन आहे, त्यामुळे तो करत असतांना भगवंता कडेच लक्ष असावे .त्यामुळेच समर्थांनी या श्लोकात शाश्वत सुख कसे मिळवायचे आणि आपली वृत्ती कशी भगवंता कडे लावावी हे सांगितले आहे
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
