मना वासना
दुष्ट
कामा
न
ये
रे
।
मना सर्वथा पापबुद्धी नको
रे
॥
मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
मना अंतरीं सार वीचार राहो ॥४॥
आपण
बागेमध्ये फिरत आहोत आणि
आपली नजर एका सुंदर
फुलावर पडते. त्या फुलाला पाहताक्षणीच
आपला चेहरा एकदम खुलतो, टवटवीत
होतो, अगदी त्या फुलासारखा!
कारण त्या फुलाला पाहताक्षणीच
आपल्या मनात विचार येतो
की, खरंच हे फूल किती
सुंदर आहे. त्याचा रंग
व सुगंधदेखील आपल्याला मोहून टाकतो.त्यामुळे मन प्रसन्न होते आणि बागेतली फुल बघत काही वेळ आनंदात जातो.
जसा सुंदर गोष्टी बघून वेळ आनंदात जातो तसेच एखादा अपघात बघितला तर त्याचे विचार मनात
कित्येक तास राहतात , दिवस भर तो अपघात डोळ्यासमोरून जात नाही . थोडक्यात समोर असलेले
दृश्य बदलले तरीसुद्धा मनात विचार तसेच पूर्वीचेच राहतात आणि त्याचा परिणाम आपल्या
वागण्यावर होतो. याचे उलट सुद्धा होते ,मनात विचार आले की त्या प्रमाणे आपल्या हातून
कृती होत जाते . म्हणून समर्थ इथे म्हणतात दुष्ट वासना ,किंवा वाईट कृत्य करावी असे मनात येऊ देऊ
नको. कारण विचार आले की तशा भावना जागृत होतात आणि त्या रेंगाळत राहतात. त्यातून आपला
स्वभाव आणि वृत्ती बदलते , मग हातून कृती (कर्म) तसे घडते आणि तशीच वृत्ती होत जाते
. म्हणजे वाईट वासना आणि पाप बुद्धी मनात आणलीच नाही तर पुढील भावना-स्वभाव-कर्म-स्मृती
ही साखळी सुरूच होत नाही . श्रीगोंदवलेकर महाराजही सांगतात, ‘‘वासना ही लाडावलेल्या कुत्र्यासारखी
आहे. तिला नुसते हड्
हड् करून ती बाजूला
जात नाही. तेही बरोबर आहे,
कारण आपणच तिला लाडावून
ठेवली आहे. म्हणून भगवंताच्या
पूजेच्या वेळीसुद्धा ती देवघरात येते.
बरे चांगली वासना तेवढी आत येऊ द्यावी
असे म्हणावे, तर तिच्याबरोबर वाईट
वासना पण हळूंच आत
येते. शिवाय, वाईट वासनेमध्ये चांगल्या
वासनेला मारण्याचे बळ आहे; कारण
आपण स्वत: वाईट वासनेच्या बाजूचेच
आहोत!’, एखादा मनुष्य काळा असेल तर
त्याला आपले काळेपण काही
घालवता येत नाही; त्याप्रमाणे,
वासना असणे हा मनुष्याचा
एक सहजगुण आहे, तो त्याला पालटता
येत नाही. तर मग आम्हाला वासनेतून कधीच मुक्त होता येणार नाही का? मनुष्याच्या ठिकाणी
इतर प्राणिमात्रापेक्षा जर काही वेगळे असेल तर चांगले काय आणि वाईट काय हे कळण्याची
बुद्धी". त्यालाच विवेक असे म्हणतात . वाईट वासना आणि पाप बुद्धी मनात येऊच ना
देण्याचा प्रयत्न करावा. तेव्हा शांतपणे आपल्याला मनात कोणते विचार ठेवायचे याचा अभ्यास
करावा आणि प्रयत पूर्वक सकारात्मक आणि भगवंताचे विचार मनात आणावे म्हणजे पापी आणि वाईट
वासना शिरायला जागाच मिळणार नाही प्रारंभ
आपण आपले
विचार स्वत: निर्माण करू शकतो . (आय
एम द क्रियेटर) व
आपला आत्मविश्वासदेखील वाढू लागतो . मना वासना दुष्ट
कामा
न
ये
रे
।
मना सर्वथा पापबुद्धी नको
रे
॥
कर्णाला
आपण कुंतीपुत्र आहोत हे कळण्याचा
काही मार्ग नव्हता. (कृष्ण वा कुंती यांनी
सांगेपर्यंत). त्याने कौरव दरबारात आपली धनुर्विद्या प्रगट
केली तेव्हा लगेचच दुर्योधनाने त्याला आयुष्यभरासाठी जवळ केले. सर्व
मानसन्मान व वैभव त्याला
प्राप्त झाले होते. त्यापुढील
त्याचे आयुष्य सुखाने जाण्यास काही हरकत नव्हती.
पण दुर्योधनाची मैत्री त्याला तशी महागच पडली
कारण नंतर आयुष्यभर दुर्योधनाच्या
सर्व कुटिल बेतांमध्ये त्याला सामील व्हावे लागले. त्याने ते स्वखुषीनेच केले.
घमेंडखोर व उद्धट स्वभावामुळे
त्याला बढाया मारण्याची खोड जडली. वास्तविक
विद्यार्थी दशेत अर्जुनाचा व पांडवांचा कर्णाने
द्वेष करावा असा कोणताही कटू
प्रसंग या शैक्षणिक काळात
या विद्यार्थ्यांत निर्माण झालेला नाही. तरीही कर्णाने कौरवांच्या बाजूने लढायचे ठरवले. प्रत्यक्ष कृष्णाने त्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला पण त्याने
नीतिने वागायचे सोडून दिले, पांडवाच्या बाजूने लढायचं की कौरवांच्या बाजूने
लढायचे याचा सारासार विचार
न करता कर्ण अर्जुनाचा
उगीचच द्वेष करू लागला . याचा
परिणाम काय झाला हे
आपल्याला माहिती आहेच. इतका पराक्रमी आणि शूर
योद्धा असूनही त्याच्या गुणांचा काहीही उपयोग झाला नाही. हेच
समर्थ सांगत आहेत की नुसते
गुण असून उपयोग नाही
,नीती आणि सारा सार
विचार तितकाच महत्वाचा. मना सर्वथा नीति सोडू नको हो । मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥
