अनुक्रमणिका

|| भये व्यापिले सर्व ब्रह्मांड ...भयो मानसी सर्वथाही असेना ॥ १३६ ॥ अहो ज्या नरा रामविश्वास ....वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८ ॥ गणाधीश जो ईश सर्वा ....गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥ जगीं पाहतां साच तें काय ...भ्रमे भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ॥ १४४ ॥ जनी सांगतां ऐकतां जन्म ..... तुटे वाद संवाद तो हितकारी ॥ ११२ ॥ जनीं भोजनीं नाम वाचे वदावे .....तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ ८९ ॥ जनीं सर्वसूखी असा कोण ....त्यासारखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥ जिवा कर्मयोगे जनीं जन्म....कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥ जेणें मक्षिका भक्षिली ...तया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना।। १५९।। तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले....गुरूवीण तो सर्वथा ही न दीसे ||१७९ ||
धुरू लेकरूं बापुडे ....नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७ ॥ न ये राम वाणी तया थोर ...बहू आगळें बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥ नको रे मना वाद हा ....अहंभाव जो राहिला तूजपासी॥१६०॥ नव्हे कर्म ना धर्म ना.......प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥ प्रभाते मनीं राम चिंतीत ..जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥ फुकाचे मुखी बोलता काय ...विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ॥ ११४ ॥ बहू शास्त्र धुंडाळितां वाड ...गती खुंटती ज्ञानबोधें प्रबोधें ॥ १५७ ॥ बहू हिंपुटी होईजे ....अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २० ॥ बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा.....समस्तांमधे एक ते आगळे रे || १५२ }} भजावा जनीं पाहता राम एकू .....धरा जानकीनायकाचा विवेकू ॥ १३१ ॥ भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे......परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८७॥ मना पापसंकल्प सोडूनि ....विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥ मना पाविजे सर्वही सूख .....मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४० || मना मानसीं दुःख ... विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥ मना वासना दुष्ट कामा .. मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥ मना वासना वासुदेवीं.....मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे ॥ १२८ ॥ मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे......मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥ मना सज्जना भक्तिपंथेची ....जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥. मुखी राम त्या काम बाधू शकेना.......जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८७ ॥ सदा सर्वदा देव सन्नीध आहे....नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥ shlok 001 to 010
अधिक दर्शवा

 



 

 मना सज्जना भक्तिपंथेची जावे

 तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे

जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे । 

जनीं वंद्य ते सर्व भावे करावे

सकाळची प्रसन्न वेळ, सडारांगोळीने शृंगारलेले अंगण आणि त्या अंगणातील तुळशीच्या पवित्र वृंदावनाजवळ उभे राहून समर्थांसारखा तेजःपुंज, वैराग्यसंपन्न, योगीराज, मेघासारख्या करुणागंभीर आवाजात या मनाच्या श्लोकांची साद घालीत असतील, त्यावेळी क्वचितच एखादे घर असेल जिथे भिक्षा मिळत नसेल . काय भाग्यवान असतील ती लोकं ज्यांच्या घरी समर्थ स्वतः जाऊन श्लोक म्हणत असतील आणि त्यांना भिक्षा घालण्याचे पुण्य मिळाले असेल. माझे पूर्वज किंवा कदाचित मी सुद्धा मागच्या जन्मी नक्कीच त्या भाग्यवानांमध्ये असेल कारण वेळेच्या पुण्याई मुळेच  मनाच्या श्लोकांनी  मला अक्षरशः वेडं केलं आहे. त्या पुण्याई मुळेच दासननवमी २०२० च्या उत्सवा च्या काळात समर्थांनी योगेश बुआ रामदासी आणि रेणुकादास रामदासी यांच्या मार्फत पोस्टाने दासबोध घरपोच पाठवला . त्याहून मोठे भाग्य म्हणजे समर्थ भक्त आणि थोर कीर्तनकार मकरंद बुआ रामदासी यांच्याशी इंटरनेट वरून ओळख घडून आली.. आणि त्यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाले.

रामदास स्वामींचे सगळे मनाचे श्लोक भुजंगप्रयात वृत्तांत आहेत. या वृत्तांत प्रत्येक ओळीत बारा अक्षरे चार गण असतात. तीन अक्षरांच्या गटांचा एकेक गण होतोगणामध्ये पहिले अक्षर ह्रस्व दुसरी दोन दीर्घ अशी रचना असते. या रचना विशेषामुळे भुजंगप्रयातातील काव्याला एक आकर्षक खटका, ठेका, ताल प्राप्त होतो आणि त्यामुळे या वृत्ताच्या माध्यमांतून सांगितलेल्या उपदेशाला एक प्रकारचा प्रभावीपणाहि येतो. समर्थ जनसंपर्कासाठी घरोघर हिंडून भिक्षा मागत असत. घराघरांशी संबंध यावा आणि जागृतीचे कार्य प्रत्येक ठिकाणी पोचावें या दृष्टीने ही भिक्षेची पद्धत फार सरस ठरली असली पाहिजे. सध्याच्या मार्केटिंग च्या भाषेत याला "कोल्ड कॉल " असे म्हणायचे . असो . आता मूळ श्लोकाकडे वळू या

एकदा मनावर कोणतीही गोष्ट  किंवा नियम घेतली कि माणूस कितीही अवघड आणि काहीही साध्या करू शकतो त्यामुळे या श्लोकात समर्थांनी मनाला वळण लावायचा प्रयत्न केला आहे . मनाला अंजारून आणि गोंजारून सज्जना असे संबोधन करून समर्थ त्याला सांगत आहेत की कायमचे समाधान पाहिजे असेल तर ते भगवंता च्या चरणापाशी  मिळेलभगवंता कडे जायला अनेक मार्ग आहेत ज्ञान मार्ग, योग्य मार्ग, कर्म मार्ग आणि भक्ती मार्ग. त्यासाठी भक्ती मार्गा इतका सोपा आणि सहज साध्य उपाय नाही . म्हणून इथे ते "भक्तीपंथेची" असा "" चा वापर करत आहेतबाकीच्या  मार्गाने जाण्याच्या भानगडीत पडू नये आणि भक्ती मार्गानेच जावे असे समसर्थ सांगत आहेत . पण भगवंताला शरण जाणे , त्याला आवडेल ते करणे, त्याला आवडेल तसे वागणे अशी काही पथ्ये पाळली तर समाधान हमखास लाभेल .  नवविधा भक्ती म्हणजे नऊ प्रकारच्या भक्ती आहेत त्यातली पहिली आणि शेवटची भक्ती ही अनिर्वाय ( COMPULSARY) आहे आणि इतर सात पैकी आपल्याला पाहिजे ती भक्ती करू शकतो. श्रवण ,कीर्तन, पादसेवन, नामस्मरण ,अर्चन, वंदन, दास्य , सख्य आंणि आत्मनिवेदन या नऊ भक्ती आहेत..  श्रवण भक्ती पासून सुरुवात करायची आणि शेवटी आत्मज्ञान मिळण्याचे  ठिकाण म्हणजे आत्मनिवेदन भक्ती, मधल्या  सात भक्ती म्हणजे एकप्रकारचे वाहन आहे, या पैकी आपल्या गुरूने सांगितलेल्या  "भक्तीवाहनात"  बसून आपण प्रवास सुरु करायचा. पण नुसत्या भक्ती मार्गावर प्रयाण करून आपण  समाधानी होणार नाही . त्याच बरोबर काही पथ्ये पण पाळायला हवीत . वैद्याने दिलेले औषध घेतले आणि त्याने सांगितलेली पथ्ये पाळली नाहीत तर त्या औषधाचा गुण येणार नाही . तसे आपल्या सज्जनांनी (सद्गुरु) आवडेल तसे वागणे आणि त्यांनी सांगितलेल्या निषिद्ध गोष्टी ना करणे हे तितकेच महत्वाचे आहे. सदाचाराने, नीतीने  वागणे आणि दुष्ट बुद्धी ने  वाईट मार्गाने संपत्ती मिळवणे अशी काही पथ्ये पाळणे अनिवार्य आहे. "लोक काय म्हणतील असे वाटल्यामुळे " असे वागणे म्हणजे  "जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे ।जनीं वंद्य ते सर्व भावे करावे" असे नाही. त्या साठी आतून आणि मनापासून सदाचाराने वागणे महत्वाचे आहे. संतांच्या शिकवणी नुसार वर्तन करा आणि भक्ती मार्गावर चालावे हाच संदेश समर्थांना इथे द्यायचा आहे

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मना मानसीं दुःख आणू नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥ विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी । विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी