गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।
गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥
समर्थ रामदासानी रचलेले मनाचे श्लोक (मनोबोध) खूप सोपे आहेत आणि नीट समजले आहेत असे आपल्याला वाटते . परंतु त्या मध्ये संपूर्ण गीता आणि वेदांत भरलेला आहे. सोप्या गोष्टी अवघड करून सांगितले की ती व्यक्ती खूप विद्वान असे लोकांना वाटते . पण समर्थांनी येथे वेदांत सारखी अवघड गोष्ट सोपी करून सांगितली आहे. प्रत्येक श्लोकात गर्भित वेदांत भरलेला आहे . वेद म्हणजे सोन्याची खाण आणि त्याच खाणीतील सोने वापरून समर्थानी आपल्यासाठी READY MADE २०५ सोन्याचे दागिने भेट म्हणून दिले आहेत. २ min MAGGIE NOODLE च्या जमान्यात हे २ मिनिटात पाठ करण्यासारखे, आणि समजायला सोपे श्लोक तर खूपच उपयोगी आहेत. मनाचे श्लोक म्हणजे प्रत्येक मनुष्यसाठी DOs and DONT आहेत .आपण blindly follow केले की आपले कल्याण ठरलेलच आहे . समर्थांनी वापरलेल्या भाषेत एक प्रकारचे उसळते चैतन्य आहे, आवेश आहे, साक्षात्काराचें तेज आहे, जनहिताची तळमळ आहे, सर्वप्रकारच्या मार्गदर्शनाचा नेमकेपणा आहे आणि त्यामुळे हे श्लोक अतिशय मनोवेधक आणि प्रभावी आहेत. आता प्रस्तावना पुरे झाली. पहिला श्लोक बघू.
कोणत्याही
नवीन उपक्रमाची सुरुवात गणपतीची आराधना करून आपण करतो . नवीन वहीची सुरुवात सुद्धा
"श्री गणेशाय नमः " असे लिहून करायचो. सर्वात पहिली आरती सुद्धा "सुख
करता दुख हरता " हीच गणपतीची आरती आपण शिकलो. अर्थात ही आरती रामदास स्वामींची
आहे हे खूप नंतर समजले . लहानपणी मला पहिला श्लोक सुद्धा हाच शिकवला गेला. आता ५० वर्षांनी
त्याच श्लोकांचा अर्थ लिहिणं याचा अर्थ माझे अध्यात्मिक वय वर्ष ४ आहे हे जाणवते आहे.
गणेशाचे एका शब्दात बोली भाषेत वर्णन करायचे झाले तर -ALL IN ONE GOD. बुद्धिमत्ता,
बहुश्रुतता, सूक्ष्मदृष्टि, उद्यमशीलता, क्षमाशीलता, दृढता, शौर्य, धैर्य, कर्तृत्व,
सामर्थ्य, लोकसंग्रह, नि:स्वार्थता इत्यादि इत्यादि अनेक गुण व सद्गुण ज्यात आहेत तो
म्हणजे गणेश . आपण अशा देवाची प्रार्थना का करत आहोत ते समर्थांनी पुढच्या ओवीत लिहिले
आहे "आरंभ तो निर्गुणाचा" म्हणजे ज्या निर्गुण निराकार भगवंता कडे जायचे
आहे त्याचा आरंभ गणेशा पासूनच होतो. म्हणजे याला वंदन केले आणि त्याचे आशीर्वाद घेतले
की आपल्याला २०५ श्लोक समजणारच. पण नुसते गणेशाची
आराधना करून उपयोग नाही त्या बरोबर देवी शारदे चे आशीर्वाद आपल्याला लागणार आहेत. चत्वार याचा अर्थ चार वाणी ज्या पुढील प्रमाणे
-परा(आतला आवाज) पश्यंति(भाव निर्माण होणे
पण शब्द तयार नाही झाले), मध्यमा(शब्द आणि विचार मनात निर्माण होणे ), वैखरी(जिभेने
बोलणे). या चारी वाणीचे मूलस्थान शारदा आहे म्हणून तिला येथे वंदन केले आहे. शारदा
ही वेदांची माता अर्थात जिच्यापासून वेद प्रकटले ती ब्रह्मदेवाची कन्या आहे, तिचे आशीर्वाद
असल्या शिवाय आपल्याला ज्ञान प्राप्त होणारच नाही.
हे
सगळे नमस्कार कशासाठी करायचे? अध्यात्मिक मार्गावरील
प्रवास निर्विघ्नपणे पार पडावे यासाठीं. हा प्रवास कोणता? तर राघवाच्या भक्तीने आत्मज्ञान
घेण्याचा मार्ग. सर्व मनाचे श्लोक माणसाला या मार्गाच्या प्रवासासाठी प्रवृत्त करण्याकरितां
रचले आहेत. राघवाचे उल्लेख इथे केला आहे कारण समर्थ रामाचे भक्त आहेत. इथे निर्गुण
निराकर परमेश्वर अशा अर्थाने राघवाचे संदर्भ
घ्यायचा आहे . इतर संत कृष्ण उपासना करून आत्मज्ञान करण्यासाठी सांगतील, काही दत्त
उपासना चा मार्ग पत्करतील. शेवटचे ध्येय एकच. ते म्हणजे आत्मज्ञान. आता आत्मज्ञान म्हणजे
काय ? आत्मा ज्ञान म्हणजे थोडक्यात माझे जन्माला येण्याचे प्रयोजन काय ? मी कोण आहे
? मी कशाने समाधानी होईल? या तीन प्रश्नांची उत्तरे मिळणे आणि ते अनुभवणे म्हणजे आत्मज्ञान.
म्हणजे या श्लोक मध्ये वंदन का करायचे, कुणाचे करायचे, कशा साठी करायचे आणि कुठे जाण्या करिता करायचे हे सगळे फक्त १९ शब्दात त्यांनी सांगून टाकले आहे.
