तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले । तया देवरायासी कोण्ही न बोले ॥ जगीं थोरला देव तो चोरालासे । गुरूवीण तो सर्वथा ही न दीसे ॥ १७९ ॥ समर्थांनी अतिशय कठोर शब्दात आणि एकदम रोखठोकपणे आपल्याला खूप महत्वाचा संदेश या श्लोकातून दिला आहे आणि जागे करायचा प्रयत्न केला आहे. या आधी श्लोकात समर्थ मनाला सज्जन असे म्हणत त्याला आंजारून गोंजारून समजावून सांगायचे. या श्लोकात मात्र त्यांनी एकदम आपला भक्तीचा मूळ उद्देश काय असतो हे सांगून टाकले आहे. या श्लोकापासून पुढे चार श्लोकांमध्ये समर्थ या भगवंत किंवा परमेश्वर किंवा थोरला देवाविषयीचे ज्ञान केवळ सद्गुरूच्या कृपेनेच मिळेल आणि तो सद्गुरू कसा ओळखायचा याबद्दल सांगत आहेत. यापूर्वीही बऱ्याच श्लोकांत त्यांनी संत सज्जन किंवा सद्गुरू आणि त्यांचे मार्गदर्शन याबद्दल सांगितले आहे. इथे ते म्हणतात देव -देवता देवता सगळ्याना सगळ्यांना आवडतात आणि त्यांची सगळे पूजा करतात पण खरा असलेला थोरला देव, देवराया हा या त्रैलोक्याचा निर्माणकर्ता आहे त्याला कोणी ओळखायचा फंदात पडत नाही हें सर्व आजूबाजूला दिसणारे, भासणारे विश्व ज्याच्यामुळें उत्पन्न होतें, ज्याच्या मुळे सगळे व्...