पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अनुक्रमणिका

|| भये व्यापिले सर्व ब्रह्मांड ...भयो मानसी सर्वथाही असेना ॥ १३६ ॥ अहो ज्या नरा रामविश्वास ....वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८ ॥ गणाधीश जो ईश सर्वा ....गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥ जगीं पाहतां साच तें काय ...भ्रमे भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ॥ १४४ ॥ जनी सांगतां ऐकतां जन्म ..... तुटे वाद संवाद तो हितकारी ॥ ११२ ॥ जनीं भोजनीं नाम वाचे वदावे .....तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ ८९ ॥ जनीं सर्वसूखी असा कोण ....त्यासारखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥ जिवा कर्मयोगे जनीं जन्म....कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥ जेणें मक्षिका भक्षिली ...तया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना।। १५९।। तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले....गुरूवीण तो सर्वथा ही न दीसे ||१७९ ||
धुरू लेकरूं बापुडे ....नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७ ॥ न ये राम वाणी तया थोर ...बहू आगळें बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥ नको रे मना वाद हा ....अहंभाव जो राहिला तूजपासी॥१६०॥ नव्हे कर्म ना धर्म ना.......प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥ प्रभाते मनीं राम चिंतीत ..जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥ फुकाचे मुखी बोलता काय ...विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ॥ ११४ ॥ बहू शास्त्र धुंडाळितां वाड ...गती खुंटती ज्ञानबोधें प्रबोधें ॥ १५७ ॥ बहू हिंपुटी होईजे ....अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २० ॥ बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा.....समस्तांमधे एक ते आगळे रे || १५२ }} भजावा जनीं पाहता राम एकू .....धरा जानकीनायकाचा विवेकू ॥ १३१ ॥ भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे......परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८७॥ मना पापसंकल्प सोडूनि ....विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥ मना पाविजे सर्वही सूख .....मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४० || मना मानसीं दुःख ... विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥ मना वासना दुष्ट कामा .. मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥ मना वासना वासुदेवीं.....मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे ॥ १२८ ॥ मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे......मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥ मना सज्जना भक्तिपंथेची ....जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥. मुखी राम त्या काम बाधू शकेना.......जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८७ ॥ सदा सर्वदा देव सन्नीध आहे....नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥ shlok 001 to 010
अधिक दर्शवा
इमेज
  न ये राम वाणी तया थोर हाणी ।  जनीं वेर्थ प्राणी तया नाम काणी ॥ हरीनाम हें वेदशास्त्री पुराणी ।  बहू आगळें बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥ नाम घेतांना मनात विचार येतात आणि नामाबद्दल प्रेम येत नाही हे एकवेळ समजू शकतो पण नुसते वैखरीने (तोंडाने पुटपुटणे) नाम घेणे सुद्धा जमत नसेल तर आपले जीवनच व्यर्थ आहे. आपण स्वतःच्या आयुष्याची किती हानी करून घेतो आहे याची कल्पनाही करता येणार नाही. स्वतःला सुधारण्याचे सर्व मार्ग आपण आपल्या हाताने बंद करून टाकल्यासारखे हें आहे. स्वतः च्या पायावर धोंडा पडून घेतल्या प्रमाणे आहे. आदराने रामनाम घेत नसेल तर त्यात रामाचे, परमेश्वराचे काही नुकसान होत नाही तर आपण स्वतः रामनामजपामध्ये मिळणाऱ्या स्वर्गीय आनंदाला मुकतो आहोत. अंतिम मोक्षप्राप्तीला सुद्धा मुकतो म्हणजे मग यात नुकसान कोणाचे होते? म्हणजे आपल्या सारखे करंटे आपणच कारण शेवटी अपार हानी आपलीच होते. रामाची नाही. भले देहांतानंतर मनुष्याचे सगेसोयरे त्याचे कलेवर घेऊन जाताना “रामनाम सत्य है” असा घोष करत चाललेले असले तरी त्याचा उपयोग त्या माणसाला होतो का? अर्थातच नाही कारण तेव्हा ना तो स्वत: हे नाम घेऊ शकतो न...
इमेज
  जनीं भोजनीं नाम वाचे वदावे ।  अती आदरे गद्यघोषे म्हणावे ॥ हरीचिंतने अन्न सेवीत जावे ।  तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ ८९ ॥ पूर्वी एक शिस्त / पद्धत होती - की जेवायला पान ( ताट ) घ्यायच्या आधी आपापल्या जागेवर बसायचं ( एका हाकेमध्ये !). आईने केलेले सर्व चविष्ट पदार्थ वाढून झाल्यावर , घरातील मोठे   नवेद्य दाखवणार - सण असो वा नसो . नवेद्य दाखवल्याशिवाय खायला सुरुवात करायची नाही आणि जेवताना भाजीमध्ये मीठ / तिखट कमी - जास्त काहीही झालं असेल तरी तोंडातून तक्रारीचा सूर काढायचा नाही आणि पानामध्ये काहीही टाकायचं नाही . ‘ अन्नदाता सुखी भव” म्हणूनच पानावरून उठायचं !   सत्यनारायणाचा प्रसाद ‘ वेगळाच का लागतो - नेहमीच्या गोडाच्या शिऱ्यापेक्षा ? किंवा आपण कितीही मोठे झालो तरी घरचा गरम - गरम वरणभात ( वरून तूप आणि   लिंबू घातलेला ) का चविष्ट लागतो ? कधीतरी हॉटेलमध्ये खायला छान वाटतं पण ज्या लोकांवर रोज हॉटेलमध्ये खायची वेळ येते त्यांना विचारा तेथील   जेवण कसं लागतं ते ! अन्न ब...
इमेज
  मुखी राम त्या काम बाधू शकेना ।  गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ॥ हरीभक्त तो शक्त कामास भारी ।  जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८७ ॥ श्लोकाचा अर्थ समजून घेण्याआधी “काम” आणि “ब्रह्मचारी” या दोन शब्दांचा अर्थ समजून घेऊ- काम :  कोणतीही गोष्ट हवी असे वाटणे म्हणजे काम. ती गोष्ट म्हणजे  घर , सत्ता ,नौकरी , संपत्ती किंवा स्री पासून मिळणारे शरीरसुख अशा सगळ्या गोष्टी कामची वासना या मध्ये येतात. स्त्री पासून मिळणारे सुख नेहेमीच त्याज्य नसते. शरीरसुख आणि कामवासने मध्ये सुद्धा धर्माच्या चौकटीत राहून काम उपभोगणे आणि अधर्माने  काम वासना तृप्त करणे अशीं दोन रूपें आहेत. गीतेच्या सातव्या अध्यायामध्ये धर्माच्या मर्यादेत राहणाऱ्या कामाला भगवंताचे स्वरूप मानलें आहे, तर अधर्म्य कामाला 'महाशन', 'महापाप्मा' अशी विशेषणें देऊन गीतेने तिसऱ्या अध्यायांत त्याला मनुष्यजातीचा वैरी म्हणून संबोधिले आहे. सोळाव्या अध्यायात त्याला नरकाचे दार म्हटलें आहे. त्यामुळे धर्माच्या चौकटीत राहून शरीर सुख उपभोगणे त्याज्य नाही. ब्रह्मचारी : म्हणजे जो सदैव ब्रह्माचे चिंतन करत असतो असं मनुष्य आणि त्यामु...
इमेज
।। जय जय रघुवीर समर्थ ।। मना वासना वासुदेवीं वसों दें ।   मना कामना कामसंगीं नसों दें ॥ मना कल्पना वाउगी ते न कीजे ।   मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे ॥ १२८ ॥ समर्थांच्या लेखी राम आणि कृष्ण यांत उपासनेच्या दृष्टीनें भेद नाहीं, हें येथील वासुदेव या कृष्णवाचक शब्दाचा उपयोगावरून सिद्ध होते. समर्थ स्वतः रामोपासक आहेत. पण कृष्णभक्ति करणारा वाया जातो असा सांप्रदायिक दुराग्रह त्यांचे ठिकाणी नाही. त्यामुळे आपण समर्थांचा हा मनाचा श्लोक आपण भगवत गीतेच्या बाराव्या अध्यायाच्या साह्याने समजावून घेऊ या   . त्यातील २,६,८, आणि १२ क्रमांकाचे श्लोक   खाली उद्धृत केले आहेत मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।   श्रद्धा परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥ १२-२ ॥ भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन, ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुणरूप परमेश्वराला भजतात, ते मला योग्यांमधील अतिउत्तम योगी वाटतात. ॥ १२-२ ॥  ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः । अनन्येनैव योगेन मां ध्...
इमेज
जेणें मक्षिका भक्षिली जाणिवेची। तया भोजनाची रुची प्राप्त कैंची। अहंभाव ज्या मानसीचा विरेना।  तया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना।। १५९।। माशी पोटांत गेली कीं मळमळतें. पोटांत ढवळतें, उलट्या होतात. कितीहि पंच पक्वान्नाचे रुचकर अन्न पानांत असले तरी माशी पोटात गेलेल्या स्थितींत त्याचे पचन होत नाही ढवळते, त्याची रुचीहि लागत नाही, स्वाद कळत नाहीं, खावे, जेवावे, अशी वासना राहत नाहीं. खाल्लेले सुग्रास अन्न वमनक्रियेने बाहेर पडते; एकदम चपखल आणि कोणालाही समजेल अशी उपमा इथे श्रीरामदासांनी येथे दिली आहे. म्हंणूनच एखादे काम व्हावयाचे नसले, म्हणजे ‘माशी शिंकली’ असे आपण म्हणतो. आपण कोणीतरी मोठे आहोत याची जाणीव, अहंकार, मीपणा हें सगळे विकार माशीसारखे आहेत. साधक कितीही ज्ञानी झाला आणि अनेक ग्रंथ आणि सगळ्या वेदांचे वाचन मनन केले त्याचा फायदा होणार नाही पर्यंत त्याचा मनातील अहंकार आणि मीपणा कमी होणार नाही.   ज्ञान घेता घेता माणसाला अहंकार झाला, म्हणजे तेथे अहंकाराची माशी शिंकल्यासारखीच झाली आणि तो अहंकार असल्यामुळे, पोटातच असल्यामुळे, तिथली माशी फार काळ जिवंत राहू शकणार नाही. जोपर्यंत आपला अहंक...