बहू हिंपुटी होईजे मायपोटी । नको रे मना यातना तेचि मोठी ॥ निरोधे पचे कोंडिले गर्भवासी । अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २० ॥ श्लोकात खूप अवघड शब्द आहेत त्याचे अर्थ आधी सांगतो म्हणजे श्लोक समजायला सोपा जाईल . हिंपुटी म्हणजे painfull/ वेदना निरोधे म्हणजे BARRIER /अटकाव पचे म्हणजे suffocate / जीव गुदमरणे . अधोमूख म्हणजे downward-facing /खाली डोके वर पाय एखादी अत्यंत अवघड हृदयाची शस्त्रक्रिया झाल्यावर मरता मरता वाचलो असू तर आपण लोकांना फार अभिमानाने शस्त्रक्रियाचे टाके दाखवतो आणि रंगवून सांगतो की किती यातना भोगल्या, दुःख सहन केले आणि शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरचे आयुष्यभर आभार मानतो आणि त्यांचे गुणगा...