उभा कल्पवृक्षातळू दुःख वाहे । तया अंतरी सर्वदा तेचि आहे ॥ जनीं सज्जनीं वाद हा वाढवावा । पुढे मागता शोक जीवी धरावा ॥ ६१ ॥ आपण सगळ्यांनी अर्ध्या भरलेल्या पेल्याचे उदाहरण तर किमान दोनशे वेळेला तरी ऐकले असेल. पेला अर्धा भरलेला आहे असे म्हणणारे आशावादी आणि अर्थ पेला रिकामा आहे असे म्हणणारे निराशावादी. या पुढे जाऊन “वास्तववादी” मोदी म्हणतात अर्थ पेला भरलेला आहे आणि बाकीच्या अर्थ भागात हवा भरली आहे. समर्थ आपल्याला वर्तमानवादी असावे असे शिकवतात. जें जें मनांत येईल ते तें जो पुरवितो त्या वृक्षाला कल्पवृक्ष असे म्हणतात. त्याच्यातळी उभा राहून जर कुणी दुःखाची कल्पना करील तर त्याला सतत दुःखच भोगावे लागेल. ‘अमुक मिळावं,’ ही जिवाच्या मनात उत्पन्न होणारी इच्छा भ्रामक आणि निराशावादी सुद्धा असू शकते. मग ती इच्छा योग्य आहे की अयोग्य, आपल्या हिताची आहे की अहिताची, याचा कोणताही विचार ती इच्छा पूर्ण करताना कल्पतरू करीत नसतो. कल्पवृक्ष हे काल्पनिक असले तरी मानस शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तरी सुद्धा आपल्या माहिती आहे आपण ज्या वातावरणात वाढतो, त्या वातावरणाचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्...