मना मानसीं दुःख आणू नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥ विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी । विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी
मना मानसीं दुःख आणू नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥ विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी । विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥ दहाव्या श्लोका मध्ये समर्थांनी देहाला पडणारे कष्ट किंवा दुःख हे आत्मसुख प्राप्ती साठी हिताचे असल्यामुळे त्या परिस्थितीला धैर्याने तोंड देऊन त्यालाच सुख मानावे असा विचार सांगितला आहे . त्यानंतर अकराव्या श्लोकात दुःख का येतात त्याची कारणे दिली आहेत , आतां या बाराव्या श्लोकांत पुन्हां मागे सांगितलेल्या साधनापेक्षा वरच्या प्रतीचें साधन समर्थ स्पष्ट करीत आहेत . समर्थ अशा दुःखाच्या संदर्भात उपदेश करतात कीं शरीराला वेदना सोसाव्या लागल्या तरी ते दुःख मनात आणू नकोस , हाय हाय करू नकोस , कण्हत बसू नकोस . इतरांना उच्छाद होईल असे वागू नकोस . कारण दुःख उगाळत बसून ते अजून वाढतच जाते आणि आजू बाजूची लोकं सुद्धा वैतागून आपल्याला टाळतात . आपण कधी कधी सहानुभूती मिळवण्यासाठी किरकोळ दुःख असेल तरी सगळे घर डोक्यावर घेतो ते अत्यंत चुकीचे आहे असं समर्थ ...